निपाणी परिसरात 'तंबाखू'चा नवीन प्रयोग!

यंदा वाळविण्यासाठी १५ एकराचे उद्दिष्ट : 'आयटीसी' कंपनीचे सहकार्य
 तंबाखू
तंबाखूsakal
Updated on

निपाणी: निपाणी परिसर तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पीक वाळविण्यासाठी यंदा नवीन प्रयोग राबविला जात आहे. त्यासाठी 'आयटीसी' सिगारेट कंपनीचे सहकार्य मिळत आहे. यंदा या प्रयोगासाठी १५ एकराचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी तंबाखू पट्ट्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 तंबाखू
विद्या प्रतिष्ठान आणि कॅपजेमिनी टेकनॉलॉजी दरम्यान सामंजस्य करार

निपाणी परिसर बिडीसाठी लागणाऱ्या तंबाखूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पाण्याची सोय होण्याआधी या भागातील हेच मुख्य पीक होते. दूधगंगा व वेदगंगेला बारमाही पाण्याची सोय झाल्यापासून त्याची जागा ऊस व भाजीपाला पिकांनी घेतली आहे. तरीही ठराविक शेतकरी तंबाखू उत्पादनच घेत आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून लावण केलेला तंबाखू परिपक्व झाल्यावर जानेवारीअखेर कापणी केला जातो. त्यानंतर कापून ओळीने वाळविण्यासाठी टाकला जातो. त्यास स्थानिक भाषेत 'चाप' असे म्हटले जाते. वाळल्यानंतर आठ-नऊ दिवसांनी भरणी होते. सर्व तंबाखू एकत्रित मिसळून विक्रीसाठी पोत्यापासून बनविलेल्या बोदामध्ये भरला जातो. त्यास 'चाकी' म्हटले जाते. साधारणत: गुढीपाडव्यापासून तंबाखू व्यापारी व बिछायतींकडून खरेदी होते. मात्र यंदा आयटीसी सिगारेट कंपनीच्या सहाय्याने वरिष्ठ अधिकारी संदीप पाटील व रमेश जे. आणि अक्कोळ येथील तंबाखू व्यापारी विनायक ढोले व ओंकार ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू वाळविण्याचा नवीन प्रयोग राबविण्यात येत आहे. त्यानुसार तंबाखूची पाने वाळविण्यासाठी 25 दिवसापर्यंत टांगून ठेवण्यात येत आहेत.

 तंबाखू
गोडसाखर चालवा, मी बाहेर पडतो ; श्रीपतराव शिंदे

अक्कोळचे तंबाखू व्यापारी विनायक ढोले व गळतगा येथील शेतकरी बाळू बुर्गे यांनी सांगितले की, 'खडकलाट, गळतगा, अक्कोळ, जत्राटसह तंबाखू उत्पादक पट्ट्यातील 15 एकर क्षेत्रात यंदा हा प्रयोग करण्यात येत आहे. तंबाखू प्लॉटची निवड आयटीसी कंपनीच्या तज्ज्ञांकडून केली जात आहे. या तंबाखूला योग्य दर मिळणार आहे.'

असा होणार प्रयोग...

नवीन प्रयोगानुसार तंबाखू वाळविण्यासाठी चौकोनात उभे खांब रोवून त्यावर तंबाखूची पाने सुतळीला बांधून टांगण्यात येत आहेत. पंचवीस दिवसानंतर ती बॉक्समध्ये भरून कंपनीकडे पाठविण्यात येणार आहेत. त्याच्या वजनानुसार दर देण्यात येणार आहे. तंबाखूचा दर्जा पाहून त्यानुसार उत्पादने बनविण्यात येणार असल्याचे समजते. यंदाचे यश पाहून पुढील वर्षी आयटीसी कंपनी व शेतकरी उत्पादन व खरेदीबाबत आपला निर्णय घेतील.

शेतकऱ्यांवरील टांगती तलवार होणार दूर

तंबाखू कापणीनंतर बऱ्याचदा पाऊस पडून शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यावेळी अत्यल्प दर मिळून शेतकऱ्यांच्या हाती काहीही राहत नाही. नवीन प्रयोगात मात्र नुकसानीची टांगती तलवार दूर होणार आहे. कारण पावसाळी वातावरण होताच टांगलेल्या तंबाखूवर ताडपत्री टाकल्यास पीक भिजण्याच्या भीतीपासून मुक्तता मिळणार आहे. परिणामी शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग फायदेशीर आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी याकामी उत्सुकता दाखविली आहे.

या प्रयोगाद्वारे वाळविलेला तंबाखू आयटीसी कंपनीकडून घेतला जाणार आहे. दर्जेदार उत्पादन घेणाऱ्या लहान व अति लहान शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. प्रयोगाला यश येण्याची आशा असून पुढील वर्षी क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

विनायक ढोले,तंबाखू व्यापारी, अक्कोळ

राजेंद्र चौगुले

यंदा आपल्या १० गुंठे क्षेत्रातील तंबाखू प्रयोगासाठी घेतला आहे. पूर्वीची व ही तंबाखू वाळविण्याची पद्धत वेगळी आहे. त्यातून नफा झाल्यास पुढील वर्षी क्षेत्रात वाढ करण्याबाबत निर्णय घेऊ.

राजेंद्र दादू चौगुले-झुलपे,शेतकरी, गळतगा

एक नजर

  • यापूर्वी निपाणी परिसरात होत ६० हजारावर एकरात तंबाखू.

  • ४ लाखावर जणांचे जीवनमान होते अवलंबून.

  • दीड कोटी किलो उत्पादनातून होत ५० ते ६० कोटीवर उलाढाल.

  • एकरी १० ते १२ बोद तंबाखू उत्पादन.

  • एका बोदाचे वजन ६० ते ६२ किलो.

  • बेभरवशाच्या दरामुळे शेतकऱय़ांची पाठ.

  • वेदगंगा व दूधगंगेला पाण्याची सोय झाल्याने उत्पादनात घट.

  • सध्या १५ ते २० हजार एकरात तंबाखू पीक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.