पावसासाठी शेतकऱ्याची पायी वारी (व्हिडिओ)

Farmer Praying for rain in solapur
Farmer Praying for rain in solapur
Updated on

नरखेड, ता. सोलापूर : महाराष्ट्रात इतरत्र पाऊस असताना सोलापूर, मराठवाड्याकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इतरांना जगविणारा शेतकरी आणि त्याची शेती संकटात सापडली आहे. पाऊस पडावा यासाठी येथील एका शेतकऱ्याने सोलापूर ते तुळजापूर अशी दंडवत घालत पायी वारी केली आणि तुळजा भवानी मातेला साकडे घातले. अनिल पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

''कृत्रिम पावसाच्या नावाखाली सरकारचे कोट्यवधी रुपये ठेकेदार कंपन्या गिळंकृत करतात. परंतु पाऊस पडत नाही. पाऊस नाही तर, जीवन नाही. रानोमाळ भटकुनही जनावरांना चारा, पाणी मिळत नाही. म्हणून मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे मी चारा छावणी सुरू केली. त्यात ९९७ मोठी आणि ११३ छोटी जनावरे होती. सरकारने छावणीचे बील काढले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चाऱ्याचे पैसे देता आले नाहीत. त्यामुळे चारा छावणी बंद करावी लागली. शेतकऱ्यांचे उसाचे आणि सुग्रासचे असे एकुण चार लाख रुपये माझ्यावर कर्ज झाले आहे'', असे अनिल पाटील यांनी सांगितले.

अशा वेळी गाऱ्हाणं कुणाकडे घालायचे म्हणून आई जगदंबेकडे पायी गेलो. सोलापूरची रुपा भावानी ते तुळजापूरजी आई भवानी अशी साष्टांग दंडवत घालत पायी वारी केली. तिथं जाऊन आईकडे पाऊस मागितल, असेही पाटील म्हणाले.

सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. सोलापूर तसेच मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस नाही. या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना वाचविण्यासाठीच आपण सोलापूरच्या रूपाभवानी आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी आईला साकडे घातले. आता शेतकऱ्यांना या संकटातून वाचविण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही साकडे घालणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.