कवठेमहांकाळला 45 गावातील शेतकरी भरपाईच्या प्रतिक्षेत 

Farmers in 45 villages await compensation during Kavthemahankal
Farmers in 45 villages await compensation during Kavthemahankal
Updated on

कवठेमहांकाळ : तालुक्‍यात गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करणार असे शासनाने जाहीर केले होते. मात्र दिवाळी होऊन महिना उलटत आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तालुक्‍यातील साठ गावांपैकी केवळ 15 गावांमधील सहा हजार चारशे शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 कोटी 98 लाख रुपये वर्ग झाले. उर्वरित 45 गावांमधील 9 हजार 152 शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. 

तालुक्‍यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे द्राक्षबागा, ऊसासह इतर कडधान्य पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने कृषी विभाग व तलाठ्यांना दिले. तालुक्‍यात 60 गावांमधील तब्बल 15 हजार 552 शेतकऱ्यांचे 4 हजार 332 हेक्‍टरवर पंचनामे पूर्ण झाले. पंचनामे पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आशेचा किरण निर्माण झाला.अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई लवकर शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा वाटत होती. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सर्व रक्कम खात्यावर जमा करू असे आश्वासन शासनाने दिले. 

मात्र दिवाळी महिना उलटला तरी अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तालुक्‍यातील 15 गावांमधील सहा हजार चारशे शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 कोटी 98 लाख रुपये रक्कम जमा झाली आहे. तरी अद्यापही जमा झालेल्या शेतकऱ्यांची रक्कम मोठी आहे.तहसील कार्यालय,कृषी विभाग यांनी मागणी करूनही अद्याप रक्कम शासनाकडून प्राप्त झाली नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले . 

तालुक्‍यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला निधीची मागणी केली.अद्याप निधी उपलब्ध झाला नाही.निधी उपलब्ध झाल्यास तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रथम वर्ग केला जाईल. 
- बी. जे. गोरे, तहसीलदार, कवठेमहांकाळ. 

तालुक्‍यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची निधीची मागणी केली आहे लवकरच दुसऱ्या टप्प्यात निधी मिळाल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल. 
- एम. जे. तोडकर, तालुका कृषी अधिकारी, कवठेमहांकाळ.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.