जळालेला ऊस, कुजलेला भाजीपाला घेऊन शेतकऱ्यांची काँग्रेस कमिटीवर चाल

येथील स्टेशन चौकातून काँग्रेस भवनपर्यंत जळालेला ऊस, कुजलेला भाजीपाला घेऊन शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.
sangli
sanglisakal
Updated on

सांगली : महापुरात बुडालेला ऊस जळाला, भाजीपाला कुजला. शेतकरी देशोधडीला लागला. सव्वा महिना झाला तरी एक रुपायाची मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सरकार जागे होणार का? पुढील पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर शेतकरी पत्नी, मुले, जनावरांसह रस्त्यावर उतरतील, असा इशारा सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी दिली.

येथील स्टेशन चौकातून काँग्रेस भवनपर्यंत जळालेला ऊस, कुजलेला भाजीपाला घेऊन शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हवेत घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत द्यावी, अशी टीका करण्यात आली. पृथ्वीराज म्हणाले, ‘‘सरकार निव्वळ नव्या घोषणांचे रतीब घालत आहे. शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ६५ रुपयांची मदत जाहीर करून थट्टा केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष पाहून २०१९ प्रमाणे मदत देण्याचे जाहीर केले. प्रत्यक्ष एक रुपया मिळालेला नाही. आधीच कोरोनामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. मुंबई, पुणे, हैद्राबाद, दिल्लीसारख्या बाजारपेठांत भाजीपाला गेला नाही. महापुराने तर सगळे पीक कुजून गेले आहे. शेतकरी मोडून पडला आहे.’’

sangli
'तो' फेरीवाला पोलिसांकडून सुटेल, तेव्हा आमच्याकडून मार खाईल - राज ठाकरे

ते म्हणाले, ‘‘वडेट्टीवारांपर्यंत इथल्या काँग्रेसने शेतकऱ्यांचा आक्रोश पोहचवावा. त्यांनी राज्य मंत्रीमंडळात तो मांडून पुढील १५ दिवसांत मदत हाती मिळाली पाहिजे. नागठाणेतील तरुण शेतकरी, अंकलखोपला दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. फास लावुन घेतला. सरकारच याला जबाबदार आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे. १५ सप्टेंबरनंतर कोणत्याही क्षणी हजारो लोक रस्त्यावर उतरतील. त्याचे गंभीर परिणाम झाल्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.’’

sangli
200 वर्षांपूर्वीचा मुंबई-पुणे प्रवास

नुकसानीचे तपशील

पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘उसाचे एकरी दीड लाख रुपये; सोयाबीनचे एकरी किमान १ लाख १२ हजार; ढबू मिरचीचे एकरी ३ लाख रुपये; वांगी, टोमॅटो व अन्य भाज्यांचे एकरी एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवंगत नेते पतंगराव कदम मदत व पुनर्वसन मंत्री होते तेंव्हा इकडे घोषणा व्हायची आणि पैसे काही दिवसांत मिळायचे. या सरकारमध्ये असे नेते राहिले नाहीत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.