यंदा ऑक्टोबरमध्ये पाऊस पडला आहे. त्यामुळे कर्नाटकातील विजापूर व बागलकोट भागांतील शेतकऱ्यांचा कांदा ओला झाला आहे.
बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत (Krushi Utpanna Bazar Samiti) नवीन कांद्याचा दर गडगडल्यामुळे सोमवारी (ता. २८) शेतकऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करून आंदोलन केले. दुपारी १२ वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालले. दर अचानक एक हजार ते १५०० रुपयांनी घसरल्यामुळे विजापूर, बागलकोट भागांतील नवीन कांदा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी (Farmers) आंदोलनाचा पवित्रा घेतला.