माजी आमदारांनी आपल्या पत्नीला नंदगडला सोडले आणि..

father and son critical in accident near nalagarh belgaum marathi news
father and son critical in accident near nalagarh belgaum marathi news
Updated on

खानापूर  (बेळगाव) : मच्छे (ता. बेळगाव) हुनशीकट्टी कुटूंबीय नंदगडला जात होते. त्यावेळी नंदगडहून येणाऱ्या ट्रकने हेब्बाळ गावाजवळ त्यांच्या कारला जोराची धडक दिली. झालेल्या अपघातात आई-वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले. त्याचवेळी या मार्गावरून माजी आमदार अरविंद पाटील  आपल्या चार चाकीतून महत्वाच्या कार्यक्रमासाठी सपत्नीक  जात होते.मात्र त्यांनी ही  घटना  बघताच आपली गाडी थांबवली आपल्या सहचरणीला तिथेच सोडले आणि प्रसंगावधान राखून  त्यांनी जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यास प्राधान्यक्रम दिला.  त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आणि परस्पर सहकार्याच्या वृत्तीमुळे या तीन जीवांचे प्राण वाचू शकले. 

ट्रकने कारला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात आई-वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. या अपघातात बाबु रुद्राप्पा हुनशीकट्टी (वय 50), त्यांच्या पत्नी सुजाता (वय 47) आणि मुलगा अक्षय (22, रा. मच्छे, ता.बेळगाव) हे जखमी झाले असून त्यांना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. 

मच्छे (ता. बेळगाव) हुनशीकट्टी कुटूंबीय नंदगडला जात होते. नंदगडहून येणाऱ्या ट्रकने हेब्बाळ गावाजवळ त्यांच्या कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, कारचा अर्धाअधिक भाग ट्रकमध्ये अडकला होता. त्यामुळे जखमीना  कारबाहेर काढतांना कसरत करावी लागली. स्थानिक आणि प्रवाशांनी पहारेच्या सहाय्याने कार ट्रकमधून वेगळी करून जखमींना बाहेर काढले. त्यांना तात्काळ खानापूर येथील सरकारी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.

हेही वाचा - धक्कादायक... लग्न पत्रिकेत सापडले पाच कोटीचे ड्रग... -

जखमींपैकी सुजाता आणि अक्षय यांच्या डोक्याला जबर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक फरारी झाला आहे. नंदगड पोलिस घटनेची नोंद करून घेत आहेत. 

माजी आमदाराची सामाजिक जवाबदारी 

अपघात घडला त्यावेळी माजी आमदार अरविंद पाटील नंदगडहून खानापूरकडे सपत्नीक येत होते. त्यांनी अपघात पाहून त्यांचे वाहन थांबविले. रुग्णवाहिकेला फोन करून बराच काळ उलटल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी पत्नीना तेथेच सोडून त्यांच्या वाहनातून जखमींना रुग्णालयात दाखल केले. महत्वाच्या कार्यक्रमासाठी जात असतांनाही त्यांनी तत्परता दाखविल्याने तातडीने उपचार करता आले. जखमींना जिल्हा रुग्णालयाला पाठवून ते मार्गस्थ झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.