मोहोळचे पहिले आमदार लोकनेते बाबुराव पाटील यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचे निधन

lakshmi-bai.
lakshmi-bai.
Updated on

मोहोळ (जि . सोलापूर) : मोहोळ  तालुक्यातील अनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाईं बाबुराव पाटील (वय ९५)  यांचे वृद्धापकाळाने गुरुवार ( ता ३१) निधन झाले. माजी आमदार राजन पाटील यांनी हजारोंच्या साक्षीने आई लक्ष्मीबाईच्या पार्थीवाला साश्रु नयनानी  चिताग्नी दिला. मोहोळ तालुक्याचे पहिले आमदार कै. लोकनेते बाबुराव ( आण्णा) पाटील यांच्या लक्ष्मीबाई पत्नी होत्या. तर माजी आमदार व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सून, मुली, जावई, नातू, नातसुना, परतवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबवत्सल व शिवभक्त असलेल्या कै.लक्ष्मीबाई या अनगर परिसरात बाई म्हणून परिचित होत्या.

गेवराईचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित, परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान जि. प. सदस्य विक्रांत उर्फ  बाळराजे  पाटील, तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी  संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या आजी होत्या. गेवराईचे माजी मंत्री शिवाजीराव पंडीत, माजी कुलगुरू परभणीचे  डॉ. वेदप्रकाश पाटील , गेवराईचे सुंदरराव पंडीत, जालन्याचे विलासराव खरात पाटील, कासारआष्टेचे दगडोजीराव पाटील यांच्या त्या सासु होत्या. अंत्यविधीस खासदार विजयसिंह मोहीते पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार दिलीप सोपल, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर भाऊ डोंगरे, विश्वासराव कचरे, भाऊसाहेब देशमुख, तानाजी गुंड, नाना डोंगरे, रामचंद्र क्षिरसागर, मानाजी माने, नाना चव्हाण, उपजिल्हाधिकारी  बी .आर. माळी, गटविकास अधिकारी अंजिक्य येळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, गटशिक्षणाधिकारी मारूती फडके, नायब तहसिलदार जिवन क्षिरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक आबा सांळुखे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे, माजी उपसभापती शहाजहान शेख, नगराध्यक्ष रमेश बारसकर, उपनगराध्यक्ष शौकत तलफदार, भाजपा तालुकाध्यक्ष सतीश काळे, जकराया शुगरचे अॅड पी .बी . जाधव, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष शिवाजी सावंत,  युटोपियनचे चेअरमन उमेश परिचारक,  दिलीप कोल्हे, भालू काका मोरे, लतीप तांबोळी, प्रतापसिंह गरड, बाबासाहेब क्षिरसागर, देवानंद गुंड, शिवसेनेचे दादासाहेब पवार, चेतन नरूटे, भिमाशंकर जमादार आदी तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()