Ration Rice : तब्बल आठ क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त; बेळगावातून महाराष्ट्राला तांदळाचा पुरवठा, दोघांवर गुन्हा

Food and Civil Supplies Department : कर्नाटकात महत्त्वाकांक्षी अन्नभाग्य योजना जारी आहे. योजनेद्वारे गरीब आणि आर्थिक दुर्बल शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन मिळते.
Food and Civil Supplies Department
Food and Civil Supplies Departmentesakal
Updated on
Summary

पथकाने कारवाईत ८ क्विंटल १० किलो तांदूळसाठा जप्त केला आहे. तर तांदूळ घेऊन जाणारा टेम्पोही जप्त करण्यात आला आहे.

बेळगाव : अन्न व नागरी पुरवठा खाते (Food and Civil Supplies Department) आणि पोलिस मिळून केलेल्‍या कारवाईत ८ क्विंटल स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ आज (ता. १२) जप्त करण्यात आले आहे. बेळगावहून महाराष्ट्राला (Maharashtra) तांदूळ घेऊन जाताना कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मेहबूब सुभानी अब्दुलरझाक जमादार (रा. होळेहोसूर, ता. बैलहोंगल) आणि शांतिनाथ देवेंद्र पाटील (रा. पहिला क्रॉस, मुख्य रस्ता, बसवाण कुडची, बेळगाव) अशी संशयितांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.