पदभार स्वीकारण्याच्या बैठकीतच अधिकाऱ्यांची झाडाझडती

Former MLAs take a review of development works
Former MLAs take a review of development works
Updated on

अकोले : पंचायत समितीचे सभापती दत्तात्रेय बोऱ्हाडे व उपसभापती दत्तात्रेय देशमुख यांनी गुरुवारी (ता. 9) पदभार स्वीकारला. त्यासाठी आयोजित बैठकीतच माजी आमदार वैभव पिचड यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. तालुक्‍यातील विकासकामांचा आढावा घेतला. लवकरच नवीन पदाधिकाऱ्यांसह विशेष आढावा बैठक घेऊ, त्या वेळी अद्ययावत माहिती देण्याची सूचना पिचड यांनी अधिकाऱ्यांना केली. 

अकोले तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपचे बोऱ्हाडे व उपसभापतिपदी देशमुख यांची मंगळवारी (ता. 7) निवड झाली. माजी आमदार पिचड यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात गुरुवारी नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.

माजी सभापती रंजना मेंगाळ, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेविका सोनाली नाईकवाडी, शंभू नेहे, आशा पापळ, भानुदास गायकर, माधवी जगधने, सीताबाई गोंदके आदी उपस्थित होते. माजी आमदार पिचड यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा फेटा घालून सत्कार केला, तर गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी त्यांना नियुक्तिपत्र दिले. 

विकासकामांचा आढावा 

पदभार स्वीकारल्यानंतर लगेच माजी आमदार पिचड यांनी पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या प्रमुखांची बैठक घेतली. तालुक्‍यात झालेल्या व चालू कामांचा आढावा घेतला. आरोग्य, शिक्षण, बांधकाम, एकात्मिक बालविकास, कृषी व इतर विभागांतील रिक्त पदांबाबत माहिती मागितली. रोजगार हमी योजनेच्या कामाची परिस्थिती, घरकुल योजनेचा आढावा, तसेच विविध योजनांसाठी आलेला निधी व त्याच्या विनियोगाची माहिती घेतली. लवकरच नवीन सभापती-उपसभापतींच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्याची सूचना केली. सर्व विभागप्रमुखांनी कामकाजाची माहिती सादर करण्याची सूचना केली.

कामकाजात गती आणावी

मला ठेकेदाराशी काहीही देणे-घेणे नाही. कामे पूर्ण होण्यासंदर्भात माहिती द्या. सहा महिन्यांपेक्षा जास्त दिरंगाई झालेल्या कामांची चौकशी करा. अनेक दिवसांनंतर अडचणीची माहिती घेतली असता, त्यात त्रुटी आहेत. नूतन सभापती-उपसभापतींच्या काळात प्रशासनाच्या कामकाजात गती आणावी. नूतन सभापती-उपसभापतींना घेऊन तालुक्‍यातील रस्त्यांसह सर्व बांधकामांवर जाऊन सविस्तर माहिती देण्याची सूचना पिचड यांनी केली. 

संधीचे सोने करू

माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी दिलेल्या संधीचे सोने करू. पंचायत समितीत काम घेऊन येणारा नागरिक नाराज होऊन जाणार नाही. 
- दत्तात्रेय बोऱ्हाडे, सभापती, पंचायत समिती, अकोले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.