जळाऊ लाकडासह चौदा ट्रक जप्त 

Fourteen trucks seized with firewood
Fourteen trucks seized with firewood
Updated on

नगर : झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून "इंजायली पंचरस' वाणाचे कापीव जळाऊ लाकूड चौदा ट्रकमधून विक्रीस नेले जात असताना वन विभागाच्या भरारी पथकाने जप्त केले. ही सर्व वाहने नगर-कल्याण रस्त्यावरील ढोकी टोल नाका येथे पकडण्यात आली. चौदा ट्रकचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

विभागीय वन अधिकाऱ्यांच्या फिरत्या पथकाला व टाकळी ढोकेश्‍वर येथील कार्यालयाला लाकडाच्या तस्करीची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पथकाने ढोकी टोल नाका परिसरात सापळा लावला. त्यात चौदा ट्रक अडकल्या. या ट्रकमध्ये भरलेल्या लाकडांबाबत चालकांकडे काहीही लेखी माहिती नव्हती. त्यामुळे चौदा वाहनांसह त्यातील "इंजायली पंचरस' वाणाचे सर्व कापीव जळाऊ सरपण जप्त करण्यात आले.

सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. या लाकडांमध्ये मोठे ओंडके असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्व वाहने रिकामी करून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. बीड, जामखेड, शेवगाव, नगर, श्रीरामपूर या तालुक्‍यांमध्ये विनापरवाना वृक्षांची तोड करून ते विक्रीस नेले जात असल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

दरम्यान, वृक्षांची तोड कोठे केली, त्यासाठी परवानगी होती का? हे तोडून जळाऊ सरपण नेमके कोठे नेले जात होते? ते पाठविणारे कोण? एकदम चौदा वाहने कशी पाठविली? याआधी असे प्रकार झाले आहेत का? आदी प्रश्‍न उपस्थित होत असून, त्या दृष्टीने सहायक वनसंरक्षक रमेश देवखिळे तपास करीत आहेत. 

ट्रकचालकांची नावे ः सलीम शेख, इकबाल शेख लाल, अस्लम शेख अब्दुल सत्तार, शकील कुरेशी, नाशीर पठाण, इरफान सय्यद (सर्व रा. नगर), संभाजी मोहिते, प्रशांत लेकुरवाळे (दोघेही रा. जामखेड), शेख इमरान, नवनाथ साळुंके, शेख इब्राहिम शेख मन्सूर (सर्व रा. बीड), मोहन बाबूराव मांडगे (रा. टाकळीभान), शकीर झाकीर काझी (रा. धोंडराई, जि. बीड), अक्तर पथरू शेख (रा. शेवगाव). 
 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()