Free bus ride for women : मोफत सेवेमुळे बस हाउसफुल्ल! महिलांची आता खासगीऐवजी 'बस'ला प्राधान्य

Free bus ride for women
Free bus ride for women
Updated on

बेळगाव : कर्नाटक सरकारने राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून महिलांना मोफत बस प्रवासासाठी सुरू केलेल्या शक्ती योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणारी प्रत्येक बस हाउसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अपुऱ्या बस संख्येमळे थांब्यावर प्रतीक्षा करावी लागल्याने महिलांची मोठी गर्दी दिसून आली.

Free bus ride for women
Pune News : कर्वे रस्त्यावरील ‘नो पार्किंग’ उठविण्याची मागणी; रस्त्यावर अनेक व्यावसायिक दुकाने

रिक्षा आणि इतर खासगी प्रवासी वाहनांतून प्रवास करण्याऐवजी महिलांनी परिवहनच्या बसेसना प्राधान्य दिल्याने शहर आणि तालुक्यातील बसथांब्यांवर महिलाच अधिक दिसून आल्या. अपुरी बससंख्या आणि प्रवासी अधिक असे चित्र पाहावयास मिळाले.

काल (ता. ११) दुपारी एक वाजता राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते, तर बेळगावात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते महिलांच्या मोफत बस प्रवासाची योजना सुरू झाली. आज योजनेच्या दुसऱ्याच दिवशी महिलांची प्रत्येक बस थांब्यावर गर्दी पाहावयास मिळाली. कर्नाटक राज्यातील महिलांसह ६ ते १२ वयोगटातील मुलींनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाची संधीही महिलांना उपलब्ध आहे.

त्यामुळे मंडळाच्या सर्वच बसेसना गर्दी झाली. मोफत प्रवासासाठी महिलांनी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र सोबत ठेवूनच प्रवास केला. सकाळी एकीकडे विद्यार्थ्यांची शाळेला जाण्यासाठी होणारी लगबग आणि गर्दी, आणि दुसरीकडे खासगी वाहनांऐवजी महिलांनीदेखील बसला प्राधान्य दिल्याने प्रत्येक बस फुल्ल राहिल्या.

Free bus ride for women
Cyclone Biparjoy: पुढील 12 तास महत्वाचे! 'बिपरजॉय' धारण करणार रौद्ररुप; 'या' भागासाठी IMDच्या सज्जतेच्या सूचना

परिवहन मंडळाच्या बसेसना सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री नऊ वाजेपर्यंत गर्दी असते. या कालावधीत शाळेला जाणारे विद्यार्थी, बेळगाव शहरात कामानिमित्त येणारे कामगार, प्रवासी यांची संख्या अधिक असते. पण आज या प्रवाशांबरोबरच इतर वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या महिला प्रवाशांची संख्यादेखील अधिक राहिली.

बेळगाव तालुक्यातून शहरात येणाऱ्या महिला विशेषकरून खासगी प्रवासी वाहनांना प्राधान्य देतात. या वाहनांची संख्या अधिक असून, त्यांचा दरही परिवहन मंडळाच्या बसपेक्षा कमी आहे, पण परिवहनच्या बसमध्ये मोफत सेवा असल्यामुळे महिलांनी या बसचाच आधार घेतला.

अपुऱ्या बससेवेचा फटका

परिवहन मंडळाकडे सुमारे २०० बसेस कमी आहेत. महिलांनी परिवहन बसेसना प्राधान्य दिल्याने प्रत्येक बसमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. बसेसची संख्या कमी असल्याने वेळेत प्रत्येक थांब्यावर बस उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे अनेकांना सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ बसची वाट पाहत थांबावे लागले. सकाळी नऊ वाजता प्रत्येक थांब्यावर विद्यार्थ्यांचीदेखील गर्दी झाल्याने अनेक बसचालकांना बस थांबा सोडून पुढे जाऊन थांबावे लागले. बसमध्ये प्रवासी घेण्यासाठी जागाच नसल्याने अनेक ठिकाणी वाहकांनी बस थांबविलीच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.