तेरा यार हूँ मै...! सोशल साइट्‌सवरही निभावली ‘यारी’

कोरोनामुळे भेटीगाठी रद्द; शहरातील बाजारपेठेवर परिणाम
तेरा यार हूँ मै...! सोशल साइट्‌सवरही निभावली ‘यारी’
Updated on

सांगली : 'तू जो रूठा तो कौन हंसेगा, तू जो छूटा तो कौन रहेगा, तू चुप है, तो ये डर लगता है, अपना मुझको अब कौन कहेगा? तू ही वजह.. तेरे बिना... बेवजह बेकार हूँ मैं.. तेरा यार हूँ मैं...! हे अरजित सिंग, रोचक कोहली यांनी गायलेलं गीत आज सोशल मिडीयावर ठिकठिकाणी दिसून आलं. कोरोनाच्या (covid -19 effect) पार्श्‍वभूमीवर भेटीगाठी रद्द करत फेसबुक, व्हॉट्‌सऍपसह सोशल (social media) साइट्‌सवरही ‘यारी’ निभावली जात होती. अनेकांनी हातात बॅंड बांधून मैत्री घट्ट करता आली नसली तरी संवादाचे नाते घट्ट करण्यात आले. (friendship day 2021)

तेरा यार हूँ मै...! सोशल साइट्‌सवरही निभावली ‘यारी’
मैत्रीचं त्रिकूट जाहिरात करतंय ‘क्यूट’!

ऑगस्टमधील पहिला रविवार म्हणजे मैत्रीदिन. सुट्टीचा दिवस असल्याने आजपासून पुढे भेट होईपर्यंत सोहळा रंगतो. दरवर्षी फ्रेंडशीप-डे च्या दिवशी मित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटतात. हातांवर फ्रेंडशिप बॅंण्ड्‌स बांधतात, गिफ्ट्‌स देतात. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने फ्रेंडशिप-डे केवळ एकमेकांना शुभेच्छा देऊनच साजरा झाला. कोरोनाचा परिणाम ‘फ्रेंडशिप-डे’च्या बाजार पेठेवरही दिसून आला. यंदा बाजारपेठेत ‘फ्रेंडशिप-डे’साठी असणाऱ्या साहित्य विक्रीत घट झालेली दिसून आली. कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने बाजारपेठेवर आणि हा दिवस साजरा करण्यावर परिणाम दिसून आला.

तेरा यार हूँ मै...! सोशल साइट्‌सवरही निभावली ‘यारी’
जनमानसांत 'दै. सकाळ'चे स्थान बळकट : श्रीमंत शाहू छत्रपती

ऑनलाइन हा सोहळा रंगला असून मोबाइलवरूनही दणादण मेसेज पाठवत शुभेच्छांचा वर्षाव मध्यरात्री बारापासून सुरू झाला. खास मित्र-मैत्रिणीला बाराच्या ठोक्‍याला एसएमएस पाठवून ‘मीच पहिला’ असे श्रेय घेण्याची चढाओढ होती. मैत्रीला शब्दांत गुंफतानाच कल्पक सजावट करून ‘स्क्रीन’ सजविण्याची धडपड होती. फेसबुकची पाने तर देखणीच झाली आहेत. अनेकांनी फुलांसह टेडी, फ्रेंडशिप बॅंड अशा डिझाइन वापरून पान सजविले. एकंदरीत मैत्रीचे नवे ‘नाते’ दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.