Miraj Police : तब्बल 35 DJ चालक, गणेश मंडळांना नोटिसा; कर्णकर्कश ध्वनियंत्रणेच्या दणदणाटावर पोलिसांची मोठी कारवाई

नोटिसीमध्ये विसर्जन सोहळ्यात ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
Ganesh Visarjan Miravnuk 2023
Ganesh Visarjan Miravnuk 2023esakal
Updated on
Summary

यंदा १६० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्यांऐवजी कर्णकर्कश ध्वनियंत्रणा लावली होती.

मिरज : येथे अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) दिवशीच्या गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) सोहळ्यात कर्णकर्कश ध्वनियंत्रणेचा (Sound Systems) दणदणाट करणाऱ्या ३५ ध्वनियंत्रण चालकांवर, तसेच गणेश मंडळांच्या अध्यक्षांवर कारवाईच्या नोटिसा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

नोटिसीमध्ये विसर्जन सोहळ्यात ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. या अनुषंगाने प्राप्त अहवालात मंडळांनी नियमांचे सर्रास उल्लंघन आणि डेसिबल मर्यादा ओलांडल्याचे सिद्ध झाले आहे. यंदा मिरज शहरात अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीत नियमांच्या अधिन राहून ध्वनियंत्रणेला परवानगी देण्यात आली होती.

Ganesh Visarjan Miravnuk 2023
Loksabha Election : भाजप-धजद युतीबाबत कोणीही उघड वक्तव्य करू नका; दिल्लीतून हायकमांडचा नेत्यांना स्पष्ट इशारा

यावेळी विसर्जन मिरवणुकीत गणरायांना निरोप देण्यासाठी कर्णकर्कश ध्वनियंत्रणा लावण्यात आली. यंदा १६० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्यांऐवजी कर्णकर्कश ध्वनियंत्रणा लावली होती. पोलिसांनी मिरवणुकीत प्रत्यक्ष तपासणीनंतर अहवाल ध्वनिप्रदूषण मंडळाकडे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

Ganesh Visarjan Miravnuk 2023
Navratri Festival : शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ; कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तयारी पूर्ण, 'अशी' असणार व्यवस्था

यानंतर पोलिस प्रशासनाकडून गेले दोन दिवस शहरातील नियम मोडणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष आणि ध्वनियंत्रणा मालकांवर कारवाई करण्यासंदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत. ही मंडळे आणि ध्वनियंत्रणा मालकांवर लवकरच गुन्हे दाखल होतील, असे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Ganesh Visarjan Miravnuk 2023
Rajan Salvi : उदय सामंतांविरुद्ध राजन साळवींनी केलेल्या 'त्या' अपशब्दाचा शिंदे गटानं केला निषेध; असं काय म्हटलं आमदारानं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()