बेळगाव न्यायालयाच्या आवारात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा? पाक समर्थकाला पोलिसांनी चोपलं

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात एका कुख्यात गुंडाकडून 'पाकिस्तान' समर्थनार्थ घोषणा देण्यात आली.
gangster jayesh pujari allegedly raised pro pakistan slogans in Belgaon court premises
gangster jayesh pujari allegedly raised pro pakistan slogans in Belgaon court premises
Updated on

बेळगाव : न्यायालय आवारात वादग्रस्त घोषणा देण्यात आल्याच्या आरोपावरून वकिलाने संशयिताला बुधवारी (ता.१२) चांगलेच चोपले. यामुळे न्यायालय आवारात काहीकाळ गोंधळ उडाला. शिवाय पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून घोषणा देणाऱ्यास ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात एका कुख्यात गुंडाकडून 'पाकिस्तान' समर्थनार्थ घोषणा देण्यात आली. या घोषणा देणाऱ्या आरोपीला कोर्टातीलचं काही वकिलांसह नागरिकांनी मारहाण केली. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि आयपीएस अधिकारी अलोककुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी जयेश पुजारी ऊर्फ कांता (रा. पुत्तूर, जि. दक्षिण कन्नड, सध्या हिंडलगा कारागृह) याने न्यायालयाच्या आवारात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

जयेश पुजारी याला बेळगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयात आणण्यात आले होते. याठिकाणी त्याने अचानक पाक समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरु केल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. येथील वकिलांनी या घोषणेला आक्षेप घेतला आणि घोषणेला विरोध दर्शविला. मात्र, त्यानंतरही वादग्रस्त घोषणा सुरु होत्या. यामुळे संतप्त वकिलांनी संशयिताला धारेवर धरले आणि चोपून काढले. यामुळे बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी पुढे आले आणि पुजारी याला तेथून बाहेर घेऊन आले. यामुळे एकच गोंधळ उडाला. वकील, पक्षकारांनी एकच गर्दी केली. येथून संशयिताला एपीपीएमसी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

gangster jayesh pujari allegedly raised pro pakistan slogans in Belgaon court premises
Pune Nashik Expressway : सर्वेक्षण जागेवर थांबविले जाईल! पुणे-नाशिक हायवेबद्दल अजित पवारांचं महत्वाचं विधान

गेल्या वेळी 14 जानेवारीला ज्याच्या नावे बेळगावच्या तुरुंगातून धमकीचे फोन केले होते. त्याच जयेश कांता ऊर्फ जयेश पुजारी नामक व्यक्तीच्या नावे पुन्हा धमकीचा फोन आला होता. जयेश पुजारी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून करण्यात आलेल्या चौकशीत तो दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचं समोर आले.

तर त्यानेच बेळगाव येथील कारागृहातून फोन करत गडकरींकडे 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्याला नागपूर पोलीसांनी ताब्यात घेत त्याच्यावर UAPA अंतर्गत कायदेशीर कारवाई केली होती. याचदरम्यान याप्रकरणात जयेश पुजारी याला NIA टीम ताब्यात घेतले. तर याच्याआधी केलेल्या NIA च्या चौकशीत त्याचे कुख्यात दहशतवाद्यांशी संबंध होते हे समोर आले आहे.

gangster jayesh pujari allegedly raised pro pakistan slogans in Belgaon court premises
Pune Porsche Accident: अल्पवयीन आरोपीचा निरिक्षणगृहातला मुक्काम वाढणार; नवी अपडेट आली समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.