तब्बल 26 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड म्हमद्याचा गोळीबार आर्थिक वादातून; दोन तासांत आवळल्या चौघांच्या मुसक्या

Sangli Crime : संशयित पप्पू फाकडे आणि इम्रान दानवडे हे दोघे म्हमद्याच्या टोळीतील साथीदार आहेत.
Sangli Crime
Sangli Crimeesakal
Updated on
Summary

महम्मद नदाफ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून; त्याच्यावर जिल्ह्यासह कर्नाटक येथे खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, घरफोडी, आर्म ॲक्ट असे २६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सांगली : तब्बल २६ गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड ममद्या ऊर्फ महम्मद जमाल नदाफ याने टोळीतील साथीदारावर आर्थिक वादातूनच (Financial Dispute) गोळीबार केल्याचे समोर आले. गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास हा गोळीबार केला. यात त्याच्याच टोळीतील सलीम मकबुल मुजावर (४२, रा. गणेशनगर) हा गंभीर जखमी असून, तो उपचार घेत आहे. टोळीतील अंतर्गत वादाचा ऐन निवडणुकीत (Assembly Elections) भडका उडाल्याने शहरात खळबळ माजली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.