नगर : आईचे निधन झाल्याने ती अनाथ झाली. बाप होता, पण त्याला बाप म्हणावे कसे? असेच घरात वातावरण. लहानपणापासून तिच्या वाट्याला वनवास आला. घरात आजी होती, तीच काय तिची जवळची, बाकी सगळं वातावरण तिच्यासाठी नरक होतं. तशाही स्थितीच ती जगण्याची उमेद हरली नव्हती. तसंही चूक काय, बरोबर काय हे कळण्याचं तिचं वय नव्हतं. आणि इथंच घात झाला.
घरातून लोकांना हाकलून द्यायचा
घरातील लोकांसोबत तिचा बाप रोज भांडायचा. त्याच्यावर रागवून ती घराबाहेर जायची. आणि इथेच त्या मुलीच्या बापाने डाव साधला. आणि तिच्यावर अत्याचार केला. ती घाबरली. कोणाला काहीच सांगितली नाही. मग त्या नराधम बापाला चटकच लागली. तो दररोज घरातील लोकांना हाकलून द्यायचा. मुलगी रोज मरत होती. परंतु हे मरणं कोणालाच दिसत नव्हतं.
आजीनेच दिली मुलाविरूद्ध फिर्याद
तो पोटच्या गोळ्यावर अत्याचार करीत असे. असा प्रकार त्याने वारंवार केला. बापाच्या भीतीने मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, हा प्रकार असह्य झाल्यावर मुलीने आजीला (आरोपीच्या आईला) हा सर्व प्रकार सांगितला. आजी हे ऐकून हबकूनच गेली. आजीने नातीसह लगेच नेवासे पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलीसह चक्रावून गेले. मग त्या माऊलीने स्वत:च्या मुलाविरोधात फिर्याद दिली. मुलगा कसला तो राक्षसच. त्या महिलेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
20 वर्षे सश्रम कारावास
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी, पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पीडित मुलीच्या नराधम बापास विविध कलमांन्वये 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 14 हजार रुपये दंड केला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मयुरेश नवले यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.