Girls Education : मुलींना व्यावसायिक शिक्षणच मोफत; कला, वाणिज्य व विज्ञान शाखा वगळल्या

मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली.
Girls Free Education
Girls Free Educationsakal
Updated on

नवेखेड - मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली. ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच लागू करण्यात आली आहे. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखांतील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

पारंपरिक शाखांतील विद्यार्थिनी वंचित -

- ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींचे प्रमाण ३६ टक्के इतके मर्यादित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी, मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी मिळण्यासाठी, महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाऐवजी, मुली व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून राज्य मंत्रिमंडळाच्या ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या ईडब्लूएस, एसईबीसी, ओबीसी मुलींना उच्च शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के सवलत मिळणार आहे. यात अनाथ मुले व मुलींनाही उच्च शिक्षणाच्या शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के सवलत दिली जाणार आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिकअभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून राज्यातील मुली उच्व शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती. या निर्णयाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

असे आहे योजनेचे स्वरूप

1) राज्यातील शासकीय महाविद्यालये, अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस लाभ मिळणार आहे. यातून खासगी अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळली आहेत.

2) शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी, ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींना व्यावसायिक शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभाऐवजी १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. यातून व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळण्यात आली आहेत. यासाठी राज्य सरकारने ९०६.०५ कोटी रुपये अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com