सांगली : महाविकास आघाडी सरकार (mahavikas aaghadi) मधील ओबीसी नेते (OBC) हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर आहेत. ओबीसी मंत्र्याच्या शब्दाला कवडीची किंमत नाही, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी माध्यमांशी बोलताना केली.
ते म्हणाले, "महाविकास आघाडी सरकार मधील ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. ओबीसी नेत्याचे माकड झाले आहे. या ओबीसी मंत्र्याच्या शब्दाला कवडीची किंमत राहिली नाही. ओबीसी समाजाला दगाफटका करणाऱ्या महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी चोख उत्तर दिले आहे. महाराष्ट्रमध्ये (maharashtra) होणाऱ्या या निवडणुकामध्ये सर्व जागेवर ओबीसीचे उमेदवार उभे केले जातील असे जाहीर केले आहे. आम्ही फडणवीस यांचे आभारी मानतो. त्याच्या पाठीमागे सर्व ओबीसी समाज राहील."
ते म्हणाले, "जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित होत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार नाहीत, अशी भीम गर्जना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या निवडणूक जाहीर झाल्या. या ओबीसी नेत्याच्या शब्दाला मातीमोल किंमत या आघाडी सरकारने केली आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ओबीसी नेते मलिदा खाण्यासाठी सत्तेमध्ये आहेत का, त्यांनी आत्मसन्मान विकला आहे का? या सर्व प्रश्नावर महाराष्ट्र मधील ओबीसी समाज जागृत झाला आहे. येत्या 26 तारखेला ओबीसी समाज आपली ताकत दाखवत या सरकारला जागा दाखवनार आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.