कोरोना टेस्ट किट विक्रीची नोंद ठेवा; औषध विक्री दुकानदारांना शासनाचे आदेश

औषधांच्या दुकानात कोरोना तपासणी करण्यासाठी किट उपलब्ध झाली आहेत.
korona test kit
korona test kitsakal
Updated on

इस्लामपूर : कोरोनाची रॅपिड अँटीजन टेस्ट(rapid antigen test) किट खरेदीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता नसल्याने नागरिक एकापेक्षा अधिक किट खरेदी करत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचा(health department) ताण वाढल्याने कोरोना बाधितांची नेमकी संख्या निश्चित करणे आव्हानच बनले आहे. याकरिता औषध विक्री दुकानदारांना याबाबतचा तपशील नोंदवून ठेवण्याचे आदेश शासनाने काढले आहेत.

korona test kit
नववीतील मुलाचा प्रयोग! शेतकऱ्यांसाठी बनविली जादूची काठी

औषधांच्या दुकानात कोरोना तपासणी करण्यासाठी किट उपलब्ध झाली आहेत. त्याची किंमत सरासरी २५० रुपये आहे. नाकातील स्त्रावाच्या नमुन्याद्वारे किटमधून किरोनाची चाचणी घरच्या घरी करता येते. तिसऱ्या लाटेत त्याचा वापर वाढला आहे. अनेक लोक घरातच चाचणी करीत आहेत. कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली तरी अनेकजण विलगीकरणाच्या भीतीपोटी आरोग्य विभागाकडून आपला अहवाल लपवत आहेत.

यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. या किटला इंडियन काऊन्सील मेडिकल रिसर्चने मंजुरी दिल्याने त्याच्यावर निर्बंध आणणे देखील शक्य नाही. गेल्या काही दिवसांत खासगी दुकानातून किट घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. किट घेणाऱ्यांचा चाचणी अहवाल काय आला याची माहिती आरोग्य यंत्रणेला नाही. त्यामुळे नेमकी कोरोनाबाधितांची संख्या आरोग्य यंत्रणेला ठरवणे अवघड झाले आहे. कोरोना झाला तरी त्याबाबतची लक्षणे आणि त्रास सौम्य असल्याने औषध दुकानातून औषधे घेऊन रुग्ण बिनधास्त सर्वत्र वावरत आहेत.

आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली

रॅपिड अँटिजेन टेस्ट (rapid antigen test)किटला आयसीएमआरनेच मान्यता दिल्याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नागरिक औषध दुकानातून किट खरेदी करीत आहेत. घरच्या घरी कोरोनाची तपासणी करीत आहेत. चाचणी करून औषधोपचार घेणे टाळत आहेत. घरच्या घरी सुरू झालेल्या प्रयोगशाळेमुळे शासनाच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

korona test kit
कोल्हापूर : सादळे - मादळेत तीन गव्यांचा वावर ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र(hospitals) अशा ठिकाणी शासनाने मोफत व मुबलक प्रमाणात कोरोना चाचणी किट (corona testing kit)उपलब्ध करून दिले आहेत. नागरिकांनी खासगी ठिकाणी किट खरेदी करून कोरोनाची चाचणी करणे टाळावे. खासगी किट खरेदी करून तपासणी केली तर त्याचा अहवाल शासनास कळविणे बांधनकारक आहे.

- डॉ. नरसिंह देशमुख, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()