पाहा कोण म्हणतयं: सरकार उद्यापासून सुरळीत 

Government will start tomorrow: Patel
Government will start tomorrow: Patel
Updated on

शिर्डी : राज्यात तीन पक्षांचे सरकार पहिल्यांदा आले आहे. छोट्या-मोठ्या अडचणी असतातच. दोन दिवसांत खातेवाटप सुरळीत होईल. सोमवारपासून सर्व मंत्री कामकाज पाहतील, असा विश्‍वास माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर केवळ सावरकरच नव्हे, तर कुठल्याही देशभक्त व महान व्यक्तीबद्दल आक्षेप घेणे अथवा वाद-विवाद करणे योग्य नाही, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

आज पटेल यांनी साईसमाधीचे दर्शन घेतले. साई संस्थानचे माजी विश्‍वस्त बिपिन कोल्हे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, उपनगराध्यक्ष नीलेश कोते, दीपक गोंदकर आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी साई संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत केले. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की भाजपने एकाही राजकीय पक्षाला विश्‍वासात न घेता नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर केला. त्यामुळे देशातील शांतता बिघडली. या कायद्याच्या विरोधातील आंदोलनात युवकवर्गाची वाढती संख्या चिंतेची बाब ठरली. महागाई, शेतकरी व मंदीसारख्या समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हा कायदा आणला. मात्र, एनआरसीमुळे एकट्या आसाममध्ये सोळा लाख हिंदू, एक लाख गुरखा व दोन लाख मुस्लिमांच्या नागरिकत्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. हा कायदा लगेचच आणि घाईने आणण्याची गरज नव्हती. 

राज्यातील तीन राजकीय पक्षांचे सरकार हे समान कार्यक्रमावर आधारित आहे. त्या आधारे ते सुरळीत चालेल. पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करील, असा दावा त्यांनी केला. या वेळी साई कोतकर, प्रसाद पाटील, किरण माळी व संजय कोतकर आदी उपस्थित होते. 

फुटबॉल टीमची प्रगती 
भारताच्या फुटबॉल टीमचे जागतिक मानांकन एकशे शहात्तरवरून चवऱ्यान्नवपर्यंत आले. युवा खेळाडूंच्या संघांची प्रगती लक्षात घेता पुढील पाच वर्षांत भारताचा फुटबॉल संघ जागतिक स्पर्धेत चांगली कामगिरी करेल, असा विश्‍वास माजी मंत्री पटेल यांनी या वेळी व्यक्त केला. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.