Gram Panchayat Results : सांगलीत महाविकास आघाडीला 38, महायुतीला 33 गावांत सत्ता; खासदार पाटील, गोपीचंद पडळकरांच्या गटांची काय अवस्था?

जिल्ह्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election Results) रणसंग्रामाचा निकाल लागला.
Gram Panchayat Election Results Sangli
Gram Panchayat Election Results Sangli esakal
Updated on
Summary

आटपाडी तालुक्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचा प्रभाव वाढल्याचे दिसून आले.

सांगली : जिल्ह्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election Results) रणसंग्रामाचा निकाल लागला. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाने ३८ गावांत सत्ता मिळवली. ३३ गावांत भाजप, शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून, १३ ठिकाणी स्थानिक आघाड्यांची सत्ता आली आहे.

बहुतांश ठिकाणी सत्ता अबाधित राखण्यात नेत्यांना यश आले. थेट सरपंच निवडीमुळे प्राथमिक माहितीनुसार, ७ ठिकाणी सत्ता एकाची आणि सरपंच वेगळ्या गटाचा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजप खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांचे समर्थक तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर यांनी हरिपूरची सत्ता राखली. त्यांनी काँग्रेसच्या मोहिते गटाचा पराभव केला.

Gram Panchayat Election Results Sangli
Gram Panchayat Election Results : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची जोरदार मुसंडी; महायुतीची वाढली ताकद, 'महाविकास'ला फुटीचा फटका

मोहिते गटाने सहा जागा जिंकत तांबवेकर यांच्या एकहाती सत्तेसमोर आव्हान निर्माण होईल, एवढी लढत दिली. नांद्रे गावात काँग्रेसचा वरचष्मा कायम राहिला. कुंडल (ता. पलूस) या सर्वांत मोठ्या गावात राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अरुण लाड यांच्या गटाने मोठे यश मिळवले. काँग्रेसच्या महेंद्र लाड गटाने केवळ तीन जागांवर यश मिळवले.

Gram Panchayat Election Results Sangli
Satara Crime : चारित्र्याच्या संशयावरून दारुड्या पतीनं भिंतीवर डोकं आपटून पत्नीला केलं ठार; पुरावा नष्ट करण्यासाठी मुलांची घेतली मदत

आटपाडी तालुक्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचा प्रभाव वाढल्याचे दिसून आले. खानापूर तालुक्यात बाबर-पाटील गटाने दोन-दोन ग्रामपंचायती जिंकल्या. जत तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपला प्रभाव कायम राखला.

शिराळ्यात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या समर्थकांनी भाजप समर्थकांच्या दुप्पट यश मिळवले. कवठेमहांकाळ तालुक्यात आर. आर. आबा गट आणि घोरपडे गटाने सात-सात गावांत सत्ता मिळवली, तेथे भाजपची पीछेहाट झाली आहे. मनसेकडे जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत असून, ती या वेळीही कायम ठेवण्यात जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना यश मिळाले.

Gram Panchayat Election Results Sangli
Gram Panchayat Results : कोल्हापुरात 29 ग्रामपंचायतींत सत्तांतर; 'इतक्या' ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी मारली बाजी, नेत्यांच्या गटांची काय अवस्था?

ग्रामपंचायत निकालाचे तालुकावार चित्र

तालुका महाविकास महायुती स्थानिक आघाडी

  • शिराळा १३ (राष्ट्रवादी) ७ (भाजप) ५ (मनसे १)

  • आटपाडी ० ११ (भाजप ७, सेना ४) ३

  • वाळवा ३ (राष्ट्रवादी) ० १

  • कवठेमहांकाळ १४ (राष्ट्रवादी ७, घोरपडे ७) २ (भाजप) २

  • जत ० ५ (भाजप) ०

  • मिरज ४ (काँग्रेस) १ (भाजप) ०

  • खानापूर ० ४ (२ अजितदादा) ०

  • तासगाव ० २ (भाजप) ०

  • कडेगाव २ (काँग्रेस) १ (भाजप) ०

  • पलूस २ (काँग्रेस १, राष्ट्रवादी १) १ (भाजप) १

  • एकूण ३८ ३३ १३

(ही आकडेवारी सदस्यसंख्येच्या आधारावर आहे. अनेक गावांत विविध पक्ष व गटांनी आमचीच सत्ता, असा दावा केला आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.