यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळी सात वाजता मानकरी, पुजारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आरती करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय... चांगभलं...च्या जयघोषात आप्पाचीवाडी-कुर्ली (ता. निपाणी) येथील हालसिद्धनाथ यात्रेच्या (Halsiddhanath Yatra Appachiwadi) मुख्य दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सोमवारी पहाटे भगवान डोणे महाराज (Krishnat Done Maharaj) यांची भाकणूक कथन झाली. यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांची गर्दी होती.