वाहनाची 'आरोग्य पुस्तिका' आहे का? दुचाकी, चारचाकीच्या देखभाल-दुरुस्तीच्या नोंदी ठरतात महत्त्वाच्या!

वाहनाची ‘आरोग्य पुस्तिका’ ही संकल्पना अनेक ठिकाणी रुजलेली आहे. आपणही तिचा अवलंब केला पाहिजे.
Vehicle Health Booklet Concept
Vehicle Health Booklet Conceptesakal
Updated on
Summary

वाहनाची आरोग्य पुस्तिका ही संकल्पना आपल्याकडे फार कमी लोक वापरतात. काही वाहन एजन्सी (Vehicle Agency), दुरुस्ती गॅरेज चालकासमोरील आरशाच्या मागे स्टीकरच्या स्वरुपात ती लावतात.

सांगली : बाळ जन्माला आल्यानंतर आईच्या (Mother) हाती आरोग्य पुस्तिका (Health Book) दिली जाते. त्यात बाळाचे डोस, त्याची औषधे (Medicines), वजन व उंची याच्या नोंदी ठेवल्या जातात. हीच प्रक्रिया हुशार वाहन मालक आपल्या चारचाकी किंवा दुचाकीबाबत पार पाडतो. वाहनाची ‘आरोग्य पुस्तिका’ ही संकल्पना अनेक ठिकाणी रुजलेली आहे. आपणही तिचा अवलंब केला पाहिजे. जेव्हा कधी तुमचे वाहन विकायची वेळ येईल, तेव्हा आरोग्य पुस्तिकेमुळे त्याला अधिक भाव मिळेल, हे नक्की.

वाहनाची आरोग्य पुस्तिका ही संकल्पना आपल्याकडे फार कमी लोक वापरतात. काही वाहन एजन्सी (Vehicle Agency), दुरुस्ती गॅरेज चालकासमोरील आरशाच्या मागे स्टीकरच्या स्वरुपात ती लावतात. वाहनाचे सर्व्हिसिंग कधी झाले, किती किलोमीटर वाहन धावले, टायर कधी बदलले, बॅटरी कधी बदलली आदी नोंदी त्यात असतात, जेणेकरून पुढचे सर्व्हिसिंग कधी होणार, याबाबतची माहिती पटकन कळते आणि वाहनाचे नुकसान टळते.

Vehicle Health Booklet Concept
MPSC Exam : स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक बदलले; वयोमर्यादेच्या काठावरील परीक्षार्थींना मोठा फटका

लाखो रुपयांची वाहने खरेदी करायची तर त्याची देखभाल आणि दुरुस्ती वेळेवर करणे, ही आपली जबाबदारी असते. त्यामुळे अपघात टळतात, वाहन उत्तम स्थितीत राहते, भविष्यात त्याची विक्री करताना त्याला चांगला दर मिळतो आणि जो कोणी नवा मालक असेल, तर त्यालाही ती सवय लागते.

अनेक वाहन मालकांना चारचाकीचा विमा संपला आहे, याची माहिती असत नाही. रस्त्यावर कधीतरी वाहतूक नियंत्रण पोलिस अडवतात, चौकशी करतात आणि मग जाग येते. सुदैवाने हल्ली विमा कंपनी प्रतिनिधी झोपेतून जागे करतात, मात्र आपणच सावध असणे चांगले. तेच प्रदूषण प्रमाणपत्राचे. वेळच्या वेळी ते घेतले की अडचण नाही. विशेषतः एखादा अपघात झाला तर विमा संरक्षण मिळवण्यासाठी या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात.

Vehicle Health Booklet Concept
Sangli Lok Sabha : 'सांगली'साठी विश्‍वजित कदमांसह प्रदेश नेत्यांची कसोटी; शिवसेनेपुढे न झुकण्यावर काँग्रेस ठाम

दुचाकीचा गोंधळ

दुचाकी नवीन असली तरी पावसाळ्यात तिचे स्पीडॅमीटर, गिअर खराब होण्याचे प्रमाण वाढते. मालक एकदा-दोनदा ते बदलून घेतो. तीन-चार वर्षांनंतर ते मीटर बंद होते आणि वाहन किती धावले, त्यात ऑईल बदली करून किती दिवस झाले, याच्या नोंदी राहत नाहीत. त्यासाठी छोटी आरोग्य पुस्तिका किंवा आपल्या डायरीत त्याची नोंद करणे लाभदायी ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()