आरोग्य विभागाची ‘हर घर दस्तक’; १२ ते १८ वयोगटासाठी घरोघरी लसीकरण

शहरात आणि गावपातळीवर पहिला आणि दुसरा डोस न घेतलेल्या १८ पेक्षा कमी वयोगटातील मुलांना घरी भेट देऊन लसीकरण करण्यात येईल.
health department initiative har ghar dastak  Home vaccination for 12 to 18 year belgaum
health department initiative har ghar dastak Home vaccination for 12 to 18 year belgaumesakal
Updated on

बेळगाव : जिल्ह्यामध्ये १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम हाती घेण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरु केली आहे. 'हर घर दस्तक' असे नाव अभियानाला देण्यात आले आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये मोहिमेंतर्गत लसीकरण चालेल. दरम्यान, १२ ते ४४ या वयोगटामध्ये सुमारे २३ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी १२ ते १८ वयोगटात सुमारे ३ लाख लसीकरण झाले आहे. शहरात आणि गावपातळीवर पहिला आणि दुसरा डोस न घेतलेल्या १८ पेक्षा कमी वयोगटातील मुलांना घरी भेट देऊन लसीकरण करण्यात येईल.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यावर याची जबाबदारी असेल. वेळोवेळी याचा आढावा घेतला जाईल. पुरेशा स्वरुपात लस उपलब्ध आहे. यामुळे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही करण्यात येणार आहे. याची जबाबदारी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर असणार आहे. तर आशा कार्यकर्ते व अंगणवाडी सेविकांचे सहाय्य घेण्यात येईल. जिल्ह्यात कोविडचे प्रमाण घटले असून, त्याला कारणीभूत यशस्वी लसीकरण मोहिम आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसचे उद्दिष्ठ शंभर टक्के यशस्वी झाले आहे. बूस्टर डोसही बऱ्यापैकी जणांनी घेतली आहे.

मात्र, १२ ते १८ वयोगटातील लसीकरण खूप कमी आहे. पालक व मुलांतील भिती त्याला कारणीभूत आहे. शिवाय मार्च आणि एप्रिल महिन्यांत परीक्षा होत्या. यानंतर उन्हाळी सुटी लागली. यामुळे लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे प्रतिनिधी प्रत्येकाच्या घरी जाऊन लसीकरणासाठी प्रोत्साहित करतील. दरम्यान, यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात अधिकृत आदेश बजाविण्यात येण्याची शक्यता आहे.

आकडे बोलतात....

१२ ते ४४ वयोगटातील लसीकरण

वय पहिला डोस दुसरा डोस

१२ ते १४ १६५१०१ ९८९८२

१५ ते १७ २२५८७२ २०१९७४

१८ ते ४४ २०८७५८३ २०९११५०

८१ लाख जणांचे लसीकरण

जिल्ह्यात एकूण ८१,४१,३४८ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यापैकी ४० लाख २८ हजार ८९८ जणांनी पहिला डोस व ३९ लाख ६३ हजार ६६३ जणांनी दुसरी लस घेतली आहे. तर १,४८,७८७ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()