Health Tips - भाऊ, व्यायाम शास्त्र समजून घ्या

काही नियम सांभाळून व्यायाम केला तर कसलाच धोका नाही.
Health
Healthsakal
Updated on

मैदानावर, जीममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. अशावेळी जिममधील व्यायामावरती बोट ठेवण्यात येत आहे. नकारात्मक सूर उमटतो. यात आपला दोष नाही. गंभीर घटनेनंतर त्याच्या कारणांना शोधणे आपले काम आहे. परंतु, या गोष्टीची दुसरी बाजूही महत्त्वाची आहे. काही नियम सांभाळून व्यायाम केला तर कसलाच धोका नाही.

दैनंदिन व्यायाम करताना मग तो कोणत्याही स्वरूपाचा असो, कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून धोका निर्माण होणार नाही हे पाहता येईल, याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे :

- व्यायाम-पूर्व तपासणी : व्यायाम सुरू करण्याआधी शरीराची अवस्था तपासून पाहा. मेडिकल हिस्ट्री असणारे आणि पस्तिशी-चाळीशी पार केलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शारीरिक तपासण्यांमध्ये कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईडस, सी-रिऑक्टव्ह प्रोटीन, होमोसिस्टिन आदी गरजेच्या असतात. याबाबत डॉक्टरांचे मत घ्यावे.

- धूम्रपान, तंबाखू सेवन, अल्कोहोल याबाबतची सर्व माहिती ट्रेनरला द्यावी. तरच तो तुमच्यासाठी शास्त्रशुद्ध प्रोग्रॅम बनवू शकेल. माहिती लपवल्यास आपणच अडचणीत येऊ.

- व्यायामाची तीव्रता, वेळ सावकाश वाढवावी. पूर्वी व्यायाम केलेल्या मंडळींनी तसेच कोणत्याही आजारानंतर व्यायाम सुरू करताना शून्यातून तो सुरू केला पाहिजे. नव्याने व्यायाम करणाऱ्यांनी सुरवातीस आठवड्यातून तीन ते चार दिवस आणि दररोज वीसएक मिनिटे व्यायाम करेणे पुरेसे.

- व्यायामात श्‍वास घेणे, सोडणे शिकून घ्या. श्‍वास कोंडून कोणताही व्यायाम करू नये. दोन सेट्समध्ये सुद्धा योग्य अंतर राखून खोलवर श्वास घेत रहावे. शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळत राहील.

Health
वात, पित्त, कफ असे त्रिदोष; वाचा कोणते पेय ठरते योग्य

- इतरांशी तुलना करू नये. ‘अमुक करतो म्हणून मी करतो’ असे नको. आपल्यातील शारीरिक बदल हा आपण आतून बाहेर पाहायला शिकले पाहिजे. कोणाला काहीएक दाखवायला व्यायाम नको.

- आपला अनुभव किंवा अभ्यास कितीही असला तरी कायम नवशिक्याच्या भूमिकेत रहावे आणि मगच पुढे जावे. व्यायामाच्या तंत्रांचा वारंवार सराव करावा. याकरिता आळस व कमीपणा वाटू देऊ नये.

- जिममध्ये अंगतोड, घामाघूम होईपर्यंत व्यायाम करण्यावर अनेकांचा भर असतो. जास्त व्यायाम म्हणजे जास्त रिझल्टस हा गैरसमज आहे. शरीराचे ऐका. थकवा वाटत असेल तर व्यायाम त्वरित थांबवा. विश्रांती हासुद्धा व्यायामाचा भाग आहे. अर्थात, सातत्य गरजेचे आहे. अनियमितता अपायकारक ठरू शकते.

- व्यायामशाळा, मैदानावर व्यायामानंतर रेंगाळू नका. घर गाठून योग्य आहार घ्या. व्यायामानंतर शरीर कमकुवत बनलेले असते. संयम ठेवा, व्यायामाचे मूलभूत नियम न मोडता पुढे जा.

- प्रणत पाटील,(व्यायाम मार्गदर्शक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.