Sangli Rain Update : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी पाणीपातळीत वाढ; ७० मिलिमीटर पावसाची नोंद

Sangli-Shirala Latest News | शिराळा तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम सुरू आहे. वारणा धरण परिसरात शनिवारी सकाळी ८ ते रविवारी सकाळी ८ या चोवीस तासांत ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली.
Heavy rain in Chandoli Dam water storage rise 70 mm of rainfall recorded sangli  shirala
Heavy rain in Chandoli Dam water storage rise 70 mm of rainfall recorded sangli shiralaSakal
Updated on

सांगली/शिराळा : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी नोंदवली गेली. शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सकाळी आठ या वेळात ७५ मिलीमीटर पाऊस झाला होता. आज सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत पुन्हा ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, आलमट्टी धरणातून आज एक लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. धरणातील आवक ८५ हजार क्युसेक इतकी आहे. त्यामुळे आलमट्टीची फूग मागे येण्याचे प्रमाण कमी होईल आणि आलमट्टी भरल्याने पुराचा वाढत निघालेला धोका कमी होईल, अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे.

जिल्हाभर आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू राहिली. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ सुरू होती. कोयना धरणातून विसर्ग बंद असतानाही नदीची पाणीपातळी वाढते आहे.

शिराळा तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम सुरू आहे. वारणा धरण परिसरात शनिवारी सकाळी ८ ते रविवारी सकाळी ८ या चोवीस तासांत ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली.

खुंदलापूर-मणदूर दरम्यानच्या मुख्य घाट रस्त्यावर जाधववाडी ते मणदूर दरम्यानच्या घाटात पावसाच्या पाण्यामुळे मुख्य रस्त्याचा काही भाग खचला. त्या रस्त्याची पाहणी मंडल अधिकारी विठ्ठल पाटील यांनी केली. दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावली.

चांदोली धरणातून सध्या विसर्ग करण्यात येत आहे. विद्युत निर्मिती करून १५९२ क्युसेकने पाणी वारणा नदीत सोडले जात आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. एका दिवसात १.०३ टी.एम.सी. म्हणजे १.२ मीटरने पाणीपातळीत वाढ झाली आहे. २१ दिवसांत ८ वेळा अतिवृष्टी झाली आहे.

वारणा नदीवरील मांगले-सावर्डे, कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव हे तीन बंधारे पाण्याखाली गेले असल्याने शिराळा व शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील काही गावांचा जवळचा संपर्क तुटला आहे.

चरण, सागाव येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी पोट मळीतील नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. आज रविवारी सकाळी ८ वाजता धरणाच्या पाण्याची पातळी ६१५.८५ मीटर तर पाणीसाठा ६९५.७६० द.ल.घ.मी.होता. धरणात २४.५७ टी.एम.सी.म्हणजे ७१.४२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

विद्युत निर्मितीतून १५९५ क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. संततधार पावसामुळे ओढे, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. धरणात १३ हजार ५३४ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

मंडल निहाय पाऊस असा (मिलिमीटरमध्ये )

कोकरुड - ३७

शिराळा - ३१.५

शिरशी -२८.३

मांगले - २७.५

सागाव - ३१.८

चरण - ५०.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.