निपाणी : शहर व परिसरात मंगळवारी (ता. 5) सकाळपासून कमालीचा उष्मा वाढला होता. सायंकाळी ढगाळ वातावरण होऊन सातच्या सुमारास तिसरयांदा विजांच्या कडकडाटात गारांसह जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर कमी असला तरी गारांचा मारा सुरुच होता. पावसामुळे सायंकाळी घरी परतणारया फेरीवाले, विक्रेते, मजूर व कर्मचारयांची तारांबळ उडाली.
पावसामुळे नगरपालिका कार्यालय, बसस्थानक, कोठीवाले काॅर्नर, चिक्कोडी रोड परिसरात असलेल्या फळविक्रेत्यासह फेरीवाल्यांची धांदल उडाली. वातावरणाचा अंदाज घेत काही फेरीवाले सहापासूनच घरी परतत असल्याचे चित्र शहरात दिसत होते. गारांचे वाढते प्रमाण असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे भाजीमार्केट, आंबा मार्केट, अक्कोळ रोडसह परिसरात ठिकठिकाणी खड्ड्यात पाणी साचून राहिले होते. त्यामुळे दुचाकीस्वारांसह वाहनधारकांना या खड्डयांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे पादचारयांची गैरसोय झाली.
वीज पुरवठा खंडीत
सायंकाळी विजांचा गडगडाट होताच शहर परिसरातील वीज पुरवठा हेस्काॅमकडून खंडीत केला होता. आधीच जोराचा पाऊस, विजेचा कडकडाट त्यात वीज पुरवठा खंडीत झाल्याने गृहिणींसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली.
जत्राटमधील कुस्ती मैदान रद्द
जत्राट येथे सिद्धेश्वर यात्रा व मल्लिकसाहेब उरुसानिमित्त कुस्ती मैदान आयोजित केले होते. मात्र निपाणी परिसरात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने कुस्ती मैदान काही वेळानंतर रद्द करावे लागले. सुरूवातीला स्थानिक पैलवानांच्या कुस्त्या झाल्या. आमंत्रित पैलवानांच्या कुस्त्यांवर पावसाचे पाणी पडल्याने कुस्ती शौकिनांची निराशा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.