आजच्या घडीला राजकीय, आध्यात्मिक, औद्योगिक, व्यावसायिक, वैचारिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ असणारे हे गाव. एकेकाळी ‘नेरलं दुपारी फिरलं’ अशी म्हण या गावासाठी रुजू होती.
नेर्ले : सद्गुरू जंगली महाराज, प. पू. जंगलीदास महाराज, संत जनाक्का आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नेर्ले हे गाव (Nerle Village). आजच्या घडीला राजकीय, आध्यात्मिक, औद्योगिक, व्यावसायिक, वैचारिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ असणारे हे गाव. एकेकाळी ‘नेरलं दुपारी फिरलं’ अशी म्हण या गावासाठी रुजू होती. वाद-विवाद, टोकापर्यंतचे भांडण आणि त्यातून खुनापर्यंत घडलेल्या घटनांमुळे दिवसाढवळ्या ‘खून करणारे गाव’ म्हणूनही ओळखले गेले.
मात्र, हे नाव नव्या पिढीने पुसून टाकले आहे. सामाजिक भान ठेवून काम करणारे नेते या गावात आहेत. गेल्या दहा वर्षांत गावाने विकासाची मुळे रुजवली आहेत. १९ व्या शतकामध्ये सद्गुरू जंगली महाराज यांचे शिष्य माऊली जंगलीदास महाराज यांनी आध्यात्मिक विचारांची, आत्मध्यानाची व मानवतेची बिजे येथे रोवली. गावातील विविध भक्तांच्या माध्यमातून जंगली महाराज आश्रमाचा जीर्णोद्धार केला.
येथील दानशूर व्यक्ती स्वर्गीय दादासाहेब बाळासाहेब पाटील यांनी त्या काळात गावाच्या आध्यत्मिक वाटचालीत योगदान देत जंगली महाराज यांना आश्रमासाठी तब्बल साडेचार एकर जमीन दान केली आणि इथूनच नेर्लेचं रूप बदललं. नेर्लेच्या इतिहासामध्ये प्रथमच आध्यात्मिक आणि वैचारिक गोष्टींना सुरुवात झाली. लोक आध्यात्मिकतेकडे वळले. यातून लोकांची विचारांची दिशा बदलली. शेती व व्यवसायाबरोबर आध्यात्मिक दृष्टिकोनातून जंगली महाराज यांच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये विचारांमध्ये परिवर्तन होऊ लागले.
संत जनाक्का यांनी वारकरी संप्रदायाची गुढी उभी केली. तद्नंतर वारकरी संप्रदाय वाढला. आध्यात्मिक साधनेच्या असणाऱ्या संत जनाक्का मंदिराची उभारणी झाली. नेर्लेच्या पहिल्या महिला संत म्हणून त्यांचा उल्लेख संत परिवारात झाला. विविध मंदिरे, मस्जिद, लोकवर्गणीतून उभी राहिली. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले बिरोबा बन व सुळकीचा डोंगर भर घालतो. लोकांची आध्यात्मिक व आर्थिक प्रगती होऊ लागली. मागील दहा वर्षांमध्ये गावांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची रेलचेल वाढली. महामार्गावरती वसलेले हे गाव आर्थिक सुबत्ता निर्माण झालेले गाव आहे.
आधार फाउंडेशन, जयंत फाउंडेशन, गौरव समिती, वारकरी संप्रदाय, जंगली महाराज आश्रम, कुस्त्या कमिट्या आदी कार्यरत आहेत. स्वर्गीय हणमंतराव मोहिते यांनी उभारलेल्या शिवशंभो वृद्धाश्रमात लोकांची सेवा होतेय. आरोग्य धोक्यात घालणारी ध्वनी यंत्रणा लोकनियुक्त सरपंच संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साउंड सिस्टिम बंदीचा ऐतिहासिक ठराव गावाने केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पदस्पर्शाची ही भूमी आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर व सावित्रीबाई विद्यालय, ब्रिटिशकालीन जिल्हा परिषद शाळा नंबर १ व जिल्हा परिषद शाळा २ आणि ३, जीसीजी इंग्लिश स्कूल यांचा चांगली पिढी घडवण्यात सिंहाचा वाटा आहे.
नेर्लेतील पहिले स्वर्गीय बॅरिस्टर बी. के. पाटील (१९७०), अजिंक्य माने (भारतीय पोलिस सेवा), अमित माने (मुख्य कार्यकारी अधिकारी), (भारतीय रक्षा संपदा सेवा (पुणे-देहू रोड छावणी), अनिल पाटील (प्रादेशिक परिवहन अधिकारी), कोकण विभाग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, डॉ. सौ. स्मिता पाटील, गट विकास अधिकारी, सुहासिनी पाटील (लेखा व वित्त अधिकारी), पल्लवी पाटील (विक्रीकर निरीक्षक), अश्विनी पाटील (पोलिस उपनिरीक्षक), सविता चव्हाण (पोलिस उपनिरीक्षक), अमित वेटम (पोलिस उपनिरीक्षक), धनश्री पाटील (पोलिस उपनिरीक्षक), प्रा. कृष्णा रोकडे (इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद), युवा संशोधक अक्षय गुरव (कर्करोगावर संशोधन), पै. आप्पासाहेब कदम (महाराष्ट्र केसरी), विपुल कुलकर्णी (इंग्लंड येथे स्वतःची कन्सल्टंट कंपनी), स्मिता पाटील (अमेरिका येथे नोकरीस), अभिजित माने (जर्मनी येथे नोकरीस) याशिवाय हॉटेल दत्त भुवन, हॉटेल मणिकंडन, हॉटेल हर्ष ही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.