Monsoon Season : वादळ, विजांचा धोका वेळीच ओळखा; शेतशिवारात जाणे, झाडाखाली थांबणे टाळा

मान्सूनच्या आधी आणि मान्सून (Monsoon) संपताच विजा चमकतात. विजा पडल्याने जीवित व वित्तहानी होते.
Rain Monsoon Meteorology Department
Rain Monsoon Meteorology Departmentesakal
Updated on
Summary

वळीव पावसाआधी अंगावर वीज पडून असंख्य लोक मृत्युमुखी पडतात. त्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन करूनही दुर्लक्षच होते.

बेळगाव : पावसाळ्याच्या (Stormy Rain) दोन महिने आगोदरच विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन वळीव पाऊस पडतो. दरवर्षी याच कालावधीत वीज पडून अनेकांना जीव गमवावे लागतात. अनेकांच्या संपत्तीचे नुकसान होते. यामुळे या कालवधीत विजेपासून स्वतःच्या बचाव करणे आवश्‍यक आहे.

Rain Monsoon Meteorology Department
Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

मान्सूनच्या आधी आणि मान्सून (Monsoon) संपताच विजा चमकतात. विजा पडल्याने जीवित व वित्तहानी होते. विद्युत उपकरणे जळण्याच्या घटना दरवर्षी होतात. जीवघेणी वीज, कधी, कोठे कशी, कोणावर? कोसळेल हे समजत नाही. त्यापासून संरक्षण करणे आणि कोणावर वीज पडल्यास त्याची मदत केली पाहिजे.

वळीव पावसाआधी अंगावर वीज पडून असंख्य लोक मृत्युमुखी पडतात. त्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन करूनही दुर्लक्षच होते. नकळत होणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका. सध्या प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतो. त्याचीपण पावसाळ्यात काळजी घेणे आवश्यक आहे. वीज चमकत असताना व विजेचा गडगडाट होत असताना मोबाईल बंद ठेवा.

Rain Monsoon Meteorology Department
सांगली, तासगावला चार दिवसांनंतर बेदाणा सौदे पूर्ववत; अडत्यांची मोठी रक्कम अडकली, शेतकरी संकटात

माणसाच्या थेट अंगावर वीज पडल्यानंतर माणसाच्या जगण्याची शक्यता कमी असते. काही प्रमाणात परिणाम झाला असल्यास माणूस वाचू शकतो. वीज पडल्यानंतर आग लागते, त्यामुळे त्वचा जळू शकते. यामुळे खबरदारीही घेणे आवश्‍यक आहे.

-डॉ. राजेश पवार, त्वचारोगतज्ज्ञ केएलई

विजेमुळे धोका

विजेचा लखलखाट प्रथम दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो. प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे विजेचा प्रकाश आधी दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो. वीज पडल्यावर काही लोक जखमी होतात, काही भाजतात, काही अपंग होतात, काहींचा मृत्यू होतो. वीज झाडांवर पडल्यास मोठे वृक्ष कोसळतात. तसेच काही जळून खाक होतात. मोठ्या इमारतीवर वीज पडल्यास इमारत कोसळते. जमिनीवर पडल्यास जमिनीत खड्डा पडतो.

Rain Monsoon Meteorology Department
Sangli Lok Sabha : महायुती भक्कम, 'मविआ'मध्ये फूट; दोन्ही आघाड्यांतील नेत्यांचा आदेश कार्यकर्ते मनापासून पाळणार का?

अशी घ्या काळजी

  • वीज कडाडण्याचा आवाज आला, तर स्वत: सुरक्षित स्थळी जावा

  • घरात किंवा एखाद्या इमारतीत ताबडतोब जा

  • दारे व खिडक्यांपासून दूर राहा

  • वाहणारा प्रवाह तारांमधून, केबलमधून तसेच पाईपमधून वाहून शरीराला इजा होऊ शकते

  • पाऊस व वीज होताना झाडाखाली उभे राहू नका

  • हातात छत्री असेल तर बंद करा

  • मोकळ्या मैदानांत झाडापासून दूर उभे राहा

  • लोखंडाची वस्तू किंवा तांब्याची वस्तू जवळ असेल तर ती दूर फेकून द्या

  • संगणक, टीव्ही, फ्रीज बंद ठेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.