कोरेगाव : एका रिपिटर परीक्षार्थीने परीक्षा सुरू असलेल्या खोलीत लपवून नेलेल्या मोबाईलद्वारे व्हॉट्सऍपवरून गणिताची प्रश्नपत्रिका दुसऱ्याच्या मोबाईलवर पाठवल्याचा प्रकार येथील डी. पी. भोसले महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारारोड (ता. कोरेगाव) येथील रिपिटर परीक्षार्थीवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल संभाजी फाळके (रा. सातारारोड,
ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या रिपिटर परीक्षार्थीचे नाव आहे. याप्रकरणी महाविद्यालयातील शिक्षिका व बारावीच्या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून नेमणुकीस असलेल्या पद्मा सचिन पलुसकर (रा. भवानी पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की बारावीच्या परीक्षेसाठी बोर्डाच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांनी मोबाईल, घड्याळ, कॅल्क्युलेटर वगैरे साहित्य परीक्षा हॉलमध्ये नेण्यास, तसेच प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका परीक्षा दालनातून बाहेर नेण्यास मनाई आहे. दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी दोनपर्यंतच्या वेळेत बारावीचा गणित विषयाच्या परीक्षेचा पेपर होता. त्यासाठी मी पर्यवेक्षक म्हणून महाविद्यालयाच्या तळ मजल्यावरील ब्लॉक नंबर दहामध्ये सकाळी साडेदहाला हजर होते. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता ब्लॉकमध्ये प्रवेश देताना नियमाप्रमाणे मी स्वतः, तसेच सहपर्यवेक्षक एस. एस. जाधव व आर. टी. ढोपे यांनी विद्यार्थ्यांची झडती घेऊन त्यांना हॉलमध्ये प्रवेश दिला. परीक्षा सुरू झाल्यानंतर विशाल फाळके नावाचा मुलगा खाली पाहून घाईत प्रश्नपत्रिका सोडवत असल्याचे व त्याचे वर्तन संशयास्पद असल्याचे समजून आले. त्याच्याजवळ जाऊन पाहिले असता त्याने डाव्या मांडीखाली मोबाईल लपवून ठेवल्याचे दिसून आले आणि याच मोबाईलवरून त्याने दुसऱ्या एका मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे तीन वेळा गणिताची प्रश्नपत्रिका पाठवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस नाईक सनी आवटे तपास करत आहेत. दरम्यान या प्रकारामुळे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रात शिक्षक, पर्यवेक्षक अधिक सतर्क झाले आहेत.
हेही वाचा : आता खुले मतदानच घ्या
जरुर वाचा : सातारकरांनाे सावधान! जे शनिवारात घडलं ते तुमच्या बराेबरही घडेल
अवश्य वाचा : ...म्हणून त्यावेळी फडणवीस सरकारला घाम फुटला : पृथ्वीराज चव्हाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.