इचलकरंजी - इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून एकूण पाच उमदवारांनी माघार घेतले. यामध्ये माजी आमदार अशोक जांभळे यांचे पूत्र सुहास जांभळे यांनी अंतिम क्षणी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी केली आहे.