प्रादेशिक समतोल साधण्याच्या नावाखाली प्रणिती शिंदेंच्या नावाला कात्री

प्रादेशिक समतोल साधण्याच्या नावाखाली प्रणिती शिंदेंच्या नावाला कात्री
Updated on


सोलापूर : महाराष्ट्र सरकारमध्ये वाट्याला आलेल्या मंत्रीपदांचे वाटप करताना प्रादेशिक समतोल साधण्याच्या सूचना केंद्रीय नेतृत्वाने दिल्या होत्या. त्यानुसार  कॅंाग्रेस मंत्रीमंडळाचे वाटप झाले. परिणामी मंत्रीमंडळ विस्तारामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाला कात्री लावावी लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील कॅंाग्रेस कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

अखेरपर्यंत चर्चेत, मात्र...
सोमवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात प्रणिती शिंदे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळणार असल्याची चर्चा गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला होता. नाव चर्चेत आल्यानंतर काहीजणांनी तातडीने मुंबईला मात्र ते मुंबईत पोचल्यावर प्रदेश कॅंाग्रेसने प्रसिद्ध केलेली यादी सोशल मिडीयावर त्यांना पहायला मिळाली आणि त्यांचा उत्साहच मावळला. 

असे झाले मंत्रीपदाचे वाटप
प्रादेशिक समतोल राखण्यासाठी कॅंाग्रेसच्या ज्या आमदारांना संधी मिळाली, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांना संधी मिळाली. त्यामुळे प्रणिती यांची संधी गेल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाडा विभागातून अशोक चव्हाण, अमीत देशमुख, मुंबई-कोकण विभागातून वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख, विदर्भातून विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, उत्तर महाराष्ट्रातून यशोमती ठाकूर यांना संधी मिळाली आहे. 

शहर व जिल्ह्यात नाराजी 
महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर मंत्रीपदासाठी सर्वात आधी नाव आले ते सांगोल्यातील शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे. त्यानंतर भारत भालके की बबनदादा शिंदे अशी चर्चा सुरु झाली. ही चर्चा इतकी रंगली की, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बबनदादा शिंदे यांना मिळते की भारत भालके यांना इथंपर्यंत पैजा लागल्या. विस्ताराची तारीख निश्चित झाली तशी, कॅंाग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यांना कॅबिनेटमंत्रीपद मिळणार अशा पोस्टही सोशल मिडीयावरून फिरू लागल्या. अखेर रविवारी रात्री साडेदहा वाजता कॅांग्रेसच्या मंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर झाली, त्यानंतर प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा रात्री अकरानंतर थांबली. दरम्यान, शिंदे यांचे नाव निश्चित असल्याची खात्री देत शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले होते, सोमवारी सकाळी त्यांचा भ्रमनिरास झाला. एकूणच सोलापूर जिल्ह्यातील पाचपैकी एकाही आमदाराला मंत्रीमंडळात स्थान न 
मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.