बेळगाव : कोरोनाच्या वाढत्या संभाव्य धोक्यामुळे राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र पोलिसांकडून रात्री साडे आठ वाजल्यापासूनच दुकाने दबाव टाकला जात असल्याने व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. तसेच नियमाप्रमाणे रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने व हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी होऊ लागली आहे.(Night curfew imposed in the state due to the growing threat of corona)
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व प्रकारचे निर्बंध ठेवण्यात आले होते. मात्र सोमवारपासून पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे तसेच सरकारने रात्री दहा ते सकाळी पाचपर्यंत नाईट कर्फ्यू असेल अशी माहिती दिली आहे. मात्र पोलिसांकडून पहिल्या दिवसापासूनच आठ वाजल्यापासूनच विविध भागात दुकाने बंद करण्यासह गर्दी कमी करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हॉटेल्स चालताना बसू लागला असून किमान दहा वाजेपर्यंत तरी दुकाने सुरू करण्याची मुभा द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. वर्षा खिरीचे दिवस असतानाच नाईट कर्फ्यू लागू करण्यात आल्यामुळे सर्वाधिक नुकसान हॉटेल चालकांचे होणार असल्याचे मत व्यक्त होऊ लागली आहे.(Hotel operators will suffer the most)
रात्री दहा वाजल्यापासून नाईट कर्फ्यू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच हॉटेल्स बंद करण्याची सूचना केली जात आहे हे चुकीचे असून दिवसा ठीक ठिकाणी गर्दी होते त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र रात्रीच्या वेळी हॉटेल्स दुकाने बंद करण्यासाठी दबाब टाकला जात असल्याने नुकसान होत असून रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवावीत
-सतीश कुगजी, हॉटेल चालक
सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र फक्त नियम व्यापारी वर्गाला लावू नयेत. सर्व व्यापारी नियमाप्रमाणे दुकाने बंद करतील. मात्र त्या पुर्वीच दुकाने बंद करण्यासाठी पोलिसांनी दडपशाही करू नये
- कृष्णा हलगेकर, व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.