ज्याप्रमाणे वक्फला घटनेविरोधात जाऊन अधिकार देण्यात आले आहेत ते अधिकार रद्द करेपर्यंत आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्वामी अदृश्य काडसिद्धेश्वर यांनी सांगितले.
बेळगाव : राज्यामध्ये मंदिर, मठाधीशांच्या मालमत्तांसह, शेतकऱ्यांच्या (Farmers) मालमत्तांवर वक्फ बोर्डाकडून अधिकार सांगितले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार असताना ‘वक्फ’ला दिलेले अधिकार घटनेविरोधात (Constitution) आहेत. त्यामुळे याविरोधात संघटित होऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहन कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींनी (Kadsiddheshwar Swami) केले.