सांगली : नाव, फोटो अन् चिन्ह असं चित्र ‘ईव्हीएम’वर पाहून सामान्य लोक मतदानाचा हक्क बजावतात; तर लष्करातील जवान आणि अधिकारी ‘ईपीबी’द्वारे (इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेट) लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतात. विशेष म्हणजे सैनिकांच्या मतपत्रिकेत उमेदवाराचे नाव, फोटो असतो, मात्र चिन्ह नसते. त्यामुळे सैनिकांना चिन्ह नव्हे तर उमेदवार पाहून मतदान करण्याची संधी मिळते.