DJ Sound: डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने गेले एकाचा प्राण? किल्लेमच्छिंद्रगड येथे झालेल्या त्या प्रकरणाचे पुढे काय झाले?

Killemchchindragarh : एखाद्या पिडीताचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची?
DJ Sound: डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने गेले एकाचे कान? किल्लेमच्छिंद्रगड येथे झालेल्या त्या प्रकरणाचे पुढे काय झाले?
DJ Soundsakal
Updated on

Ear Problem: गेल्या वर्षी डिजेसाठी असणाऱ्या डेसिबलची मर्यादा ओलांडल्याने किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे लग्नकार्यासाठी आणलेल्या डिजेमुळे एका व्यक्तीचा नाहक बळी गेला होता.

प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच संबंधितानी आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या पिडीत कुटुंबास डोळ्याच्या दाबात ठेवण्यात यश मिळविले होते. प्रकरण दाबले गेल्याने डीजेच्या कर्णकर्कश आवाजात संबंधित कुटुंबीयांच्या यातनांही कुणाच्या कानी पडल्या नाहीत.

DJ Sound: डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने गेले एकाचे कान? किल्लेमच्छिंद्रगड येथे झालेल्या त्या प्रकरणाचे पुढे काय झाले?
Ear Hole: तुमच्याही कानाचे छिद्र मोठे झाले आहेत? मग 'या' सोप्या पद्धतींचा करा वापर

यावर्षी धार्मिक मिरवणुकीत, लग्नाच्या वरातीत जिवघेणा प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी सतर्क राहायला हवे. अन्यथा गावोगावी दहा-पंधरा मंडळे असतात. इर्षेपोटी मध्यरात्री पर्यंत मिरवणुकीचा गोंधळ सुरू असतो.

त्याचा दमा, हृदयविकार असलेल्या रुग्णांना त्रास सोसावा लागतो. असह्य वेदना सहन कराव्या लागतात. रुग्णांना यातना सहन झाल्या नाहीत आणि त्यात एखाद्या पिडीताचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? हे जरी स्पष्ट असले तरी गुन्हा नोंद झाऱ्यानंतर वर्षानुवर्षे न्यायासाठी झगडावे लागेल. वर्षानुवर्षे झगडून एक पिढी न्यायासाठी झिजून थकलेली असेल.

DJ Sound: डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने गेले एकाचे कान? किल्लेमच्छिंद्रगड येथे झालेल्या त्या प्रकरणाचे पुढे काय झाले?
Ear Damage : सारखी इअरफोन वापरताय? तुम्हाला जडू शकतात 'हे' आजार ; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

आणि शेवटी काय तर अशी प्रकरणे कोर्टाबाहेर तडजोडीने मिटविली जातात. पिडीत, पोलीस प्रशासन, न्याय व्यवस्थेचा वेळ वाया जातो.

हे सर्व टाळण्यासाठी संकटापूर्वी बंधारा बांधलेला केव्हाही चांगलेच, म्हणजेच आज धार्मिक मिरवणुकीत, लग्नाच्या वरातीत पोलीसानी घालून दिलेल्या मर्यादा पाळून मिरवणुका, वराती आटोपत्या घेतल्या तर डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने एखाद्या निरपराध व्यक्तीस प्राणास मुकावे लागणार नाही. पोलीसावरील ताण कमी होईल. सामाजीक स्वास्थ चांगले राहील.

DJ Sound: डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने गेले एकाचे कान? किल्लेमच्छिंद्रगड येथे झालेल्या त्या प्रकरणाचे पुढे काय झाले?
Cattle Ear Tagging: राज्यातील पशुधनांना ‘इअर टॅगिंग’ बंधनकारक, का केली जाते इअर टॅगिंग? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.