Child Marriage : चार महिन्यांत मिरजेत बालविवाहाच्या घटना वाढल्या; प्रशासनाची निष्क्रिय भूमिका

मिरज पूर्वभागातील एका गावात आता बालविवाहाची (Child Marriage) घटना उघडकीस आली.
Child Marriages
Child Marriagessakal
Updated on

सांगली : मिरज पूर्वभागातील एका गावात आता बालविवाहाची (Child Marriage) घटना उघडकीस आली. तो रोखण्यासाठी चाईल्ड लाइन संस्थेनं पुढाकार घेतला. मात्र, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे रोखता आला नाही.

दरम्यान, बालकल्याण समितीनं (Child Welfare Committee) या घटनेची गांभीर्यानं दखल घेत संबंधित यंत्रणेला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असं समजतं आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

याविषयी अधिक माहिती अशी, की मिरज पूर्वभागातील एका मुलाचा मिरज पश्चिम भागातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी विवाह नियोजित होता. ही माहिती चाईल्ड लाइन संस्थेला मिळाली. संस्थेनं तातडीनं बालकल्याण समितीला याबाबतची माहिती दिली. बालिकेस बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ क. २ (१४) नुसार काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालिका म्हणून घोषित करण्यात आले.

Child Marriages
Shambhuraj Desai : 'कोणतंही नियमबाह्य काम आम्ही 40 आमदारांनी केलेलं नाही, न्यायालयात आमची बाजू भक्कम'

समितीचे सदस्य कालिदास पाटील, निवेदिता ढाकणे, आयेशा दानवडे, शिवकुमारी ढवळे, दीपाली खैरमोडे यांनी हा बालविवाह रोखण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. त्यांनी विवाह करणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, काल सकाळी मिरज पूर्वभागातील गावात सकाळी विवाह झाला. स्थानिक प्रशासन व पोलिस यंत्रणेला माहिती देण्यात आली होती. मात्र, निष्क्रियतेमुळं हा बालविवाह झालाच. मात्र, बालकल्याण समितीनं गांभीर्यानं दखल घेतली आहे.

Child Marriages
Nana Patole : 'काश्मीर फाइल्‍सप्रमाणंच केरळ स्‍टोरी भाजपच्या मदतीला, धर्माच्या नावावर तोडायचा प्रयत्‍न'

त्यामुळं कार्यालयाजवळ नातेवाइकांची मोठी गर्दी झाली होती. हाणामारी झाल्याचंही समजतं. मात्र, बालकल्याण समितीनं संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, असे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगानं आता कारवाई सुरू आहे. संबंधितांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल झाले नव्हते. 'चाईल्ड लाइन'चे मिनाज शेख, शहानुर दानवाडे, विशाल पाटोळे, इम्तियाज हकीम, सारिका सोकटे यांची टीम यात होती.

Child Marriages
Rajaram Sugar Factory : सतेज पाटलांच्या गटाचा 'कंडका' पाडत 'राजाराम'च्या अध्यक्षपदी अमल महाडिक

चार महिन्यांत मिरज पूर्व आणि परिसरात बालविवाह होण्याच्या घटना वाढल्या आहेत, हे कारवाईतून स्पष्ट होते. चाईल्ड लाइन संस्थेस तक्रार प्राप्त झाल्यानंतर बालकल्याण समितीच्या निर्देशानुसार तातडीनं बालविवाह रोखण्यात आले. मात्र, अद्याप पोलिस आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून ठोस कारवाई झाली नसल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.