Koyana Dam: कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, कोयना,वारणातून पाण्याचा जादा विसर्ग!

Latest Maharashtra News : आधी २ हजार १०० क्युसेक इतका विसर्ग विद्युत निर्मितीसाठी केला जात होता.
 Increase in the water level of Krishna river, excess water discharge from Koyana Varana
Increase in the water level of Krishna river, excess water discharge from Koyana Varana sakal
Updated on

Sangli News: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यामुळे कोयना धरणातून आज विसर्ग वाढवण्यात आला. सायंकाळी चारपासून १० हजार क्युसेक विसर्ग वाढवला असून, तो आता एकूण १२ हजार १०० क्युसेक इतका झाला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळी बुधवारी वाढ होणार आहे.

चांदोली धरणक्षेत्रात सलग दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने वारणा धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

कोयना धरणातील पाणीसाठा सध्या ९९.६३ टक्के इतका आहे. धरणाची क्षमता १०५ टीएमसी आहे. धरणक्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांत चांगला पाऊस

कोयना, वारणा धरणांतून विसर्गात वाढ झाला आहे. धरण भरण्याचा वेग वाढतो आहे. अशावेळी धरण पूर्ण भरले आणि पाऊस सुरू राहिला तर अडचण येऊ शकते. त्यामुळे आता धरणातून पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करण्यात आले. आधी २ हजार १०० क्युसेक इतका विसर्ग विद्युत निर्मितीसाठी केला जात होता. त्यात आता १० हजारांनी वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, चांदोली धरणातून १ हजार ४३५ क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यात २४३० क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण विसर्ग ३ हजार ८६५ क्युसेक इतका झाला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

कृष्णा नदीत २२ फूट पातळी

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसांत वेगाने वाढ झाली आहे. दहा फुटांपेक्षा कमी असलेली पातळी आज २३.७ फुटांवर पोहोचली होती. त्यात आणखी वाढ होणार आहे. पाणी पातळी २५ फुटांपेक्षा जास्त जाऊ शकते, असे सांगण्यात आले.

धरणांची स्थिती

क्षमता (टीएमसी) सध्याचा साठा (टीएमसी) विसर्ग (क्युसेक)

कोयना *१०५ * १००.३८ *१२,१००

वारणा *३५ *३३.४८ *३,८६५

राधानगरी *८.३६ *८.२३ *४,३००

काळम्मावाडी *२८ *२४ *५,०००

अलमट्टी धरण *१२३ *१२०.४१७ *१,५०,०००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.