Textile Industry : बांगलादेशातील स्थितीमुळे भारतातील वस्रोद्योगाला 'बरकत'; वस्रोद्योग कंपन्यांचे शेअर्सही वधारले

Bangladesh Violence : भारतातील उत्पादित तयार कपड्यांच्या तुलनेने बांगलादेशातील तयार कपडे खूपच स्वस्त असतात.
Textile Industry
Textile Industryesakal
Updated on
Summary

सध्या बांगलादेशात निर्माण झालेल्या माजलेल्या अराजकामुळे तेथील वस्रोद्योग ठप्प झाला आहे. त्यामुळे कपडे उत्पादनही थांबणार आहे.

इचलकरंजी : बांगलादेशातील (Bangladesh Violence) घडामोडीमुळे भारतातील सध्या मंदीतून जाणाऱ्या वस्रोद्योगाला मोठे जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तयार कपड्यांचा जगातील दुसरा निर्यातदार देश म्हणून बांगलादेशाची ओळख आहे. मात्र, हिंसक आंदोलनानंतर या देशातील कापड उद्योग सध्या पूर्णतः बंद पडला आहे. तेथील स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ जावा लागेल. त्यामुळे तेथून भारतात येणाऱ्या व तुलनेने स्वस्त असणाऱ्या तयार कपड्यांची आयात थांबणार आहे.

दुसरीकडे गणेशचतुर्थी (Ganesh Chaturthi), दिवाळी सण समोर असल्याने तयार कपड्यांना संपूर्ण भारतातून मागणी वाढणार आहे. त्यामुळे देशांतर्गत कापडाला मागणी वाढण्याची शक्यता वस्रोद्योगतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात तयार कपडे भारतात येतात. भारतातील उत्पादित तयार कपड्यांच्या तुलनेने बांगलादेशातील तयार कपडे खूपच स्वस्त असतात. त्यामुळे भारतातील गारमेंट उद्योगाला भरारी घेता आली नाही. बांगलादेशाने अलीकडच्या काळात तयार कपड्यांचा मोठा निर्यातदार देश म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.

Textile Industry
Hasan Mushrif : 'माझ्यासमोर कुणीही उभं राहू दे, कागलचा आमदार मीच होणार'; हसन मुश्रीफांचं कोणाला चॅलेंज?

या देशात वस्रोद्योगात मोठी परदेशी गुंतवणूक आहे. याठिकाणी मिळणारी स्वस्त वीज, मुबलक मनुष्यबळ, निर्यातशुल्क मुक्त धोरण असे पोषक वातावरण तेथे असल्यामुळे तयार कपड्यांचा उद्योग गेल्या काही वर्षांत बहरला आहे. मात्र, सध्या या देशात निर्माण झालेल्या माजलेल्या अराजकामुळे तेथील वस्रोद्योग ठप्प झाला आहे. त्यामुळे कपडे उत्पादनही थांबणार आहे. त्याचा मोठा फायदा भारतातील वस्रोद्योगाला होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या गणेश चतुर्थी, दिवाळी समोर आहे. यांसह इतरही सणांवेळी देशभरात मोठ्या प्रमाणात तयार कपड्यांची खरेदी होती. त्यासाठी आतापासूनच खरेदीचे सौदे होतात. सध्या बांगलादेशातून येणाऱ्या तयार कपड्यांची आयात थांबणार आहे. त्यामुळे देशातील कापड उद्योगाला गती मिळणार आहे. महाराष्ट्रासह तमिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यांत हा उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. तयार कपड्यांसाठी कापडाची गरज भासणार आहे. त्यासाठी इचलकरंजी, विट्यासह देशातील यंत्रमाग मोठ्या प्रमाणात असलेल्या ठिकाणांकडे मागणी वाढणार आहे.

एकूणच बांगलादेशातील घडामोड भारतातील वस्रोद्योगाच्या पथ्यावर पडण्याची आशा निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील वस्रोद्योग गेल्या कांही दिवसांपासून खूपच मंदीतून जात आहे. कापडाला मागणी व दर नाही. शासनाच्या ठोस धोरणांचाही अभाव आहे. महाराष्ट्रातही अतिरिक्त वीज सवलतीचा सुरू असलेला खेळखंडोबा थांबलेला नाही. असा सगळ्या प्रतिकूल परिस्थीतीमध्ये पुढील कांही दिवसांत कापडाला मागणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडचणीत जाणाऱ्या या उद्योगाला मोठी उभारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

Textile Industry
Vishalgad Riots : 'पोलिसांसमोरच विशाळगड-गजापूरमध्ये दंगल, संविधानाचे धिंडवडे निघाले'; अबू आझमींनी व्यक्त केला संताप

चीनच्या कापडावर बंदी कधी?

पूर्वी चीनचे स्वस्तातले कापड बांगला देशमार्गे भारतात येत होते. ते कापडही तूर्त तरी थांबणार आहे. कोणतेही आयात शुल्क नसल्यामुळे हे कापड भारतातील उत्पादित कापड तुलनेने स्वस्त आहे. त्यामुळे चीनमधील उत्पादित कापडावर बंदी घालण्याची देशातील वस्रोद्योगातून सतत मागणी होत आली आहे. पण, त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

कापसाच्या दरात घसरणीची शक्यता

एकीकडे बांगलादेशात उद्‍भवलेल्या परिस्‍थितीचा फायदा भारतातील वस्रोद्योगाला होणार असल्याचे दिसत आहे. पण, भारतातून बांगलादेशात कापसाची निर्यात थांबणार आहे. या देशात सूतगिरण्यांची संख्या मोठी आहे. परिणामी, भारतात उत्पादित होत असलेल्या बहुतांश कापसाची बांगलादेशात निर्यात होते. तूर्त तरी ही निर्यात थांबणार असल्यामुळे कापसाच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

Textile Industry
संजय मंडलिकांचा कोणाला पाठिंबा? मुश्रीफ की समरजित घाटगे? माजी खासदारांनी स्पष्टच सांगितलं...

वस्रोद्योग कंपन्याचे शेअर्स वधारले

बांगलादेशातील संघर्षमय परिस्‍थिती निर्माण झाल्यामुळे तेथील वस्रोद्योगावर संकट निर्माण झाले आहे. त्याचा फायदा भारतातील नामांकित वस्रोद्योग कंपन्यांना होताना दिसत आहे. अशा कंपन्यांचे शेअर्सचे दर २० टक्क्यांनी आज वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार बांगलादेशातील परिस्थितीमुळे भारतातून कापड निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता असल्यामुळे ही तेजी आली आहे.

भारतातील कपड्यांना परदेशात विशेषतः युरोपियन देशांत मागणी वाढण्याची शक्यता आहे. भारतातील निर्यातदारांबाबत जागतिक पातळीवर मोठी विश्वासार्हता आहे. त्यामुळे निर्यात वाढीसाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी निर्यात शुल्क माफ केले पाहिजे.

-अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्रोद्योग महासंघ

बांगलादेशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतातील वस्रोद्योगाला निश्चितच फायदा होणार आहे. विशेषतः गारमेंट उद्योगाला चांगली उभारी मिळू शकते. त्यासाठी लागणाऱ्या कापडाला मागणी वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योगालाही याचा लाभ होऊ शकतो.

-विनय महाजन, वस्रोद्योग अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.