महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी म्हणजे पंजाबराव देशमुख (Panjabrao Deshmukh), यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील हेही मोठ्या आवडीने धोतर नेसत असत.
वांगी : ग्रामीण महाराष्ट्रात (Rural Maharashtra) धोतर आणि लुगडं (Saree) म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहतात, ती महाराष्ट्रातील मराठमोळी जोडी आणि त्यांचा भारदस्त पेहराव! या वेशभूषेला देशभरात अनन्यसाधारण महत्त्व असून भारतीय संस्कृतीत (Indian culture) हा पारंपरिक पोषाख (Traditional Dress) आहे. परंतु सध्या बदलत्या व फॕशनच्या युगात हा वस्त्रप्रकार कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.
ग्राहकांकडून त्याची मागणीही घटली आहे. येणाऱ्या पिढीस धोतर आणि लुगडं केवळ चित्रपटातच पाहावयास मिळणार, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. शहरी भागात धोतर वापरणाऱ्यांची संख्या पूर्वीपासूनच अगदी बोटांवर मोजण्याइतकी आहे. ग्रामीण भागातही तुरळक प्रमाणात जुनी मंडळी धोतर परिधान करतात, तेही क्वचितच.
प्रामुख्याने धोतराची लांबी ४.५ मीटर असते. कमरेभोवती गुंडाळून पायातून लपेटून घेऊन कमरेपाशी गाठ देऊन ते नेसले जाते. स्वातंत्र्याच्या कालखंडात खादी गांधी टोपी, नेहरू शर्ट किंवा कुर्ता व त्यावर धोतर परिधान असा पोशाख परिधान करण्याची पद्धत होती. आजही अनेक नेत्यांच्या अंगावर हा पोशाख दिसून येतो. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी म्हणजे पंजाबराव देशमुख (Panjabrao Deshmukh), यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील हेही मोठ्या आवडीने धोतर नेसत असत.
तसेच अलीकडे अण्णा हजारे (Anna Hazare), हरिभाऊ बागडे, सातारा सांगली विधानपरिषदेचे माजी आमदार मोहनराव कदम हेही आपणास धोतराच्या पोशाखात दिसतात. अलीकडे शहरी व ग्रामीण भागात ज्येष्ठ, तसेच सत्तरी गाठलेलेदेखील धोतर ऐवजी नाईट पँट व टी-शर्टमध्ये दिसत आहेत. असाच प्रकार भारदस्त लुगड्याबाबत झाला आहे.
सध्याच्या स्त्रिया लुगडं नेसायला नाक-डोळे मुरडत आहेत. कारण लुगडं हे वजनाला भारी असते, शिवाय त्याची लांबीही अधिक असते. त्यामुळे आता हे लुगडं नामशेष होऊ लागले आहे. एकंदरीत, धोतर आणि लुगडं कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात ही जोडी केवळ जुन्या चित्रपटात पाहावयास मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.