शेतकरी कुटुंबातील किरणचा अचूक वेध;नेमबाजीत विश्‍वविक्रमापेक्षा सरस कामगिरी

शेतकरी कुटुंबातील किरणचा अचूक वेध;नेमबाजीत विश्‍वविक्रमापेक्षा सरस कामगिरी
Updated on

मुंबई : सातारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील, पण नेमबाजीचे धडे पनवेलमध्ये गिरवत असलेल्या किरण जाधवने राष्ट्रीय नेमबाजी चाचणीत विश्‍वविक्रमापेक्षा सरस कामगिरी केली. त्याने 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत विश्‍वविक्रमापेक्षा जास्त गुणांचा वेध राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत घेतला.

तिरुवअनंतपुरम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत किरणने प्रजासत्ताकदिनी ही कामगिरी केली. प्राथमिक फेरीत सहाव्या स्थानी गेलेल्या विक्रमने अंतिम फेरीत 253.4 गुणांचा वेध घेतला. या प्रकारातील 252.3 गुणांचा जागतिक विक्रम चीनच्या यू होआनान याने रिओ विश्‍वकरंडक स्पर्धेत केला आहे. जागतिक नेमबाजी संघटनेच्या नियमावलीनुसार जागतिक विक्रम केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेतच होतो. आता ही कामगिरी जागतिक विक्रम म्हणून गृहित धरली जाणार नसली तरी सातारा जिल्ह्यातील छोट्याशा गावात शिकताना नेमबाजीचे प्राथमिक धडे गिरवलेल्या किरणसाठी तसेच भारतीय नेमबाजीसाठी हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात सातारचे हे पत्र हाेतेय व्हायरल

किरणचे मूळगाव काेरेगाव तालुक्यातील भाटमवाडी हे आहे. त्याचे शालेय शिक्षण सरस्वती विद्यालय येथे तसेच महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील पिल्लई महाविद्यालयात झाले आहे. त्याच्या या यशाने सातारा जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान महिलांच्या एअर रायफलमध्ये अचूक 400 गुणांचा वेध घेऊन ऑलिंपिक पात्रता मिळवलेल्या सुमा शिरूर यांच्या लक्ष्य अकादमीत किरण शिकतो. तो सध्या नौदलात आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत हृदय हजारिका (630.7) आणि शाहू माने (630.1) यांनी किरणला (629.3) मागे टाकले होते, पण अंतिम फेरीत विक्रम बहरला. त्याच्याच शब्दांत सांगायचे तर खूप दिवसांनी शूटिंग करताना खूपच मजा आली. अंतिम फेरीत हृदय सहावा; तर शाहू आठवा आला.

किरण भारतीय नेमबाजीसाठी नवीन नाही. आशियाई स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. त्या वेळी त्याची अंतिम फेरी थोडक्‍यात हुकली होती. सुमासाठी हे यश खूपच मोलाचे आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली अनेक नेमबाजांची कामगिरी उंचावली, पण आपण पैलू पाडलेल्या किरणने मिळवलेले यश सुमाला जास्त सुखावत आहे.

हेही वाचा -  त्या प्रकरणातून उदयनराजेंसह सर्वांची निर्दाेष मुक्तता

अंतिम फेरीत नेमबाजी करताना खूपच मजा आली. त्यामुळे या यशाचा आनंद घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंतिम फेरीत विश्‍वविक्रमी कामगिरी करण्याचे लक्ष्य बाळगले होते. ते साध्य झाल्याचा खूप आनंद आहे. ही कामगिरी नक्कीच समाधान देत आहे.
- किरण जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.