किल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली): कृषी तंत्रज्ञानामध्ये पाण्यावरील हायड्रोपोनिक शेती हा पारंपरिक माती-आधारित शेतीला शाश्वत पर्याय म्हणून सामोरा येतो आहे. या जलाधारित शेतीच्या अनुषंगाने जगभरात सुरू असलेल्या संशोधनामध्ये शिवाजी विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांनीही आघाडी घेतली असून हायड्रोपोनिक प्लांटेशन हेल्थ मॉनिटरिंग मशीन या अभिनव संशोधनासाठीचे भारतीय पेटंटही त्यांना प्राप्त झाले आहे.