बेळगावसह राज्यातील १५० सरकारी आयटीआयचा दर्जा वाढविला जाणार

शासनाने 'उद्योग ४.०' योजनेची अंमलबजावणी केली असून या योजनेअंतर्गत आयटीआयचा दर्जा वाढविला जाणार आहे
Industry 4 0 scheme 150 government ITI institution including Belgaum will be upgraded education
Industry 4 0 scheme 150 government ITI institution including Belgaum will be upgraded education sakal
Updated on

बेळगाव : शासनाने बेळगावसह राज्यातील १५० सरकारी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा (आयटीआय) दर्जा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने 'उद्योग ४.०' योजनेची अंमलबजावणी केली असून या योजनेअंतर्गत आयटीआयचा दर्जा वाढविला जाणार आहे. यासाठी शासनाने टाटा टेक्नॉलॉजीसह नामांकित वीस औद्योगिक संस्थांशी करार केला आहे. एकूण ४,६३६ कोटी रुपये यासाठी खर्च केला जाणार असून टाटा टेक्नॉलॉजीने ४,०८० कोटी रुपये यात गुंतवणूक केली आहे.

तर शासनाने ६५७ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. यासह सरकारी आयटीआय कॉलेजची इमारत बांधणे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २२० कोटी रुपये अनुदान देखील मंजूर केले आहे.‌ या महत्वकांक्षी योजनेतून १ लाख कुशल कामगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. योजनेत सरकारी आयटीआय कॉलेजची इमारत दुरुस्ती, या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, १५० नव्या कार्यशाळा, ७२ तंत्रज्ञान प्रयोगालय, ७८ प्रयोगशाळांचा विकास, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण याद्वारे दिली जाणार आहे. या योजनेमुळे आयटीआय कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ विविध क्षेत्रातील उद्योगांचे प्रशिक्षण देखील प्राप्त होणार आहे.‌

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.