District Internal Checkpost : लग्न साहित्य खरेदीला चेकपोस्टचा धसका!

सीमाभागासह गोव्यातील नागरिकांची पंचाईत
Internal Checkposts buy wedding materials
Internal Checkposts buy wedding materialssakal
Updated on

आंतरराज्य, जिल्हा अंतर्गत चेकपोस्ट असे :

जिल्हा प्रशासनातर्फे आंतरराज्य आणि जिल्हा अंतर्गत चेक पोस्ट सुरू केले आहेत. जिल्ह्यांतर्गत येणारे चेकपोस्ट असे, चिकोडी (संकेश्वर क्रॉस), तेलसंग, मदभावी, काटव, सलगर रोड, मंगसुळी आरग रोड, कागवाड ते गणेशपूर रोड, शिंदेवाडी-केंपवाड, कुडची पूल, हारुगेरी क्रॉस, हंदीगुंड, नसलापूर, कंकणवाडी, कबूर, नागनूर, हळ्ळूर, यादवाड, यद्दलगुड

मालदिनी क्रॉस, घटप्रभा, कन्नूर रेल्वेस्थानक, शेट्टीहळ्ळी, कुरणी क्रॉस, कणबर्गी (कलखांब रोड), काकती पोलिस ठाणेजवळ, संतीबस्तवाड क्रॉस व्हिटीयू, कुलवळ्ळी क्रॉस, बिडी क्रॉस, नेसरगी क्रॉस, मुरगोड, भुदरकट्टी, बैलवाड क्रॉस, यरगट्टी, आचमट्टी, इनाहोंगल क्रॉस, कलहाळ, पंचगावी क्रॉस, होसकेरी क्रॉस.

Internal Checkposts buy wedding materials
Paschim Maharashtra : महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांच्या सासूबाई उमा कलघटगी यांचे निधन

आंतरराज्य चेकपोस्ट असे :

कोगनोळी, आप्पाचीवाडी क्रॉस, निपाणी-मांगूर क्रॉस, मुरगूड रोड, निपाणी, बोरगाव क्रॉस, एकसंबा, सदलगा, दत्तवाडी, अथणी, कोटलगी, गुड्डापूर रोड, ऐगळी कोहळ्ळी-सिंदनूर रोड, बळ्ळीगेरी-जत, कागवाड, मिरज रोड, मंगसुळी आरग रोड, बेडग रोड, हिटणी क्रॉस, भैरापूर क्रॉस, बुगटे आलूर क्रॉस, उळागड्डी खानापूर, दड्डी क्रॉस, कणकुंबी-सुर्ल नाका, हेम्माडगा, लोंढा, बाची, बेनकनहळ्ळी, राकसकोप्प, बेक्कीनकेरे.

चार कोटींवर रुपयांची रोकड जप्त

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यात ६१ ठिकाणी तपासणी नाके महिनाभरापासून सुरू केले आहेत. त्या ठिकाणी होणारी पैसे आणि मद्याची तस्करी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

त्यापैकी २४ आंतरराज्य महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर आहेत. तर उर्वरित जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू केले आहेत. आतापर्यंत चार कोटींहून अधिक रुपयांची रोकड व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

दुचाकीधारकांची आर्थिक लूट

चेकपोस्टमुळे अवैध प्रकारांना आळा बसला असला तरी सर्व सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. जमीन किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्यवहार केल्यानंतर मिळालेली रक्कम बँकेत जमा करण्यासाठी किंवा घरी घेऊन जाताना अनेकजण घाबरत आहेत.

Internal Checkposts buy wedding materials
Maharastra Government (GR) : या आठवड्यातील राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय पहा एका क्लिकवर..

तपासणी नाक्यावर पोलिसांकडून विनाकारण वाहनचालकांची अडवणूक करून त्रास देण्याचे प्रकार ही घडत आहेत. हेल्मेटच्या नावाखाली दुचाकीधारकांची आर्थिक लूट केली जात आहे.

ऐन लग्नसराईतच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी चेक पोस्ट उभारले आहेत. त्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते. चेकपोस्ट उभारल्याने अवैध प्रकारांना चाप बसली असली तरी लग्नसराईचे साहित्य खरेदी करण्यासाठी सीमाभाग आणि महाराष्ट्रातून बेळगावात येणाऱ्यांची मात्र, पंचाईत झाली आहे.

चेकपोस्टवर पैसे जप्त केले जात असल्याने साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत येताना पैसे घेऊन येण्यास लोक घाबरत आहेत. केवळ ५० हजारांची रोकड जवळ ठेवण्यास मुभा असल्याने लग्नसराईचे साहित्य खरेदी कशी करायचे? असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.