आंतरराज्य बससेवा बंदचा संकेश्वर आगाराला फटका

रोज चार-पाच लाखाचे नुकसान : दिवसाला 20 फेरया
Sankeshwar Bus depot
Sankeshwar Bus depot sakal
Updated on

संकेश्वर : कोरोनाने (corona) संपूर्ण जगाचेच कंबरडे मोडले आहे. सर्वच क्षेत्रात आर्थिक गणित विस्कटले आहे. त्याचा फटका संकेश्वर आगारालाही बसत आहे. आंतरराज्य बससेवा बंद झाल्याने दिवसाकाठी चार ते पाच लाख रूपयाचा फटका बसत आहे. त्यामुळे या आगाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

संकेश्वरमधून (Sankeshwar Bus depot) दिवसाला पंधरा ते वीस आंतरराज्य फेरया होत असत. त्यामध्ये पुणे, मुंबई, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, गडहिंग्लज, आजरा या भागाचा समावेश आहे. पण सेवा बंद असल्यामुळे आगाराला फटका बसत आहे. चिक्कोडी विभागातील उत्पन्नाच्या दृष्टीने मोठे आगार म्हणून या आगाराकडे पाहिले जाते.

Sankeshwar Bus depot
सातारा : 'काँग्रेस भाजपवर गुन्हे दाखल करणार'

आगारात 110 बसेस, 335 चालक-वाहक, 50 मेकॅनिक, 20 कार्यालयीन कर्मचारी सेवेत आहेत. सध्या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत असला तरी व्यवस्थापनाला आर्थिक गणित जमविणे कठीण जात आहे. त्यामुळे आंतरराज्य बससेवा सुरू होण्याची प्रतिक्षा आहे.

`कोरोनामुळे आंतरराज्य बससेवेसह यात्रा, महोत्सवाच्या बसफेरया बंद आहेत. त्यामुळे आगाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे. काटकसरीने सध्या व्यवहार केला जात आहे.`

-आर. जी. नाडगौडा, आगार व्यवस्थापक, संकेश्वर

`कोरोनामुळे कर्नाटक सरकारने आंतराज्य बससेवा बंद केली. पण त्यामुळे कामधंद्यानिमित्त आंतरराज्य प्रवास करणारयांना त्रास सहन करावा लागत आहे.`

-राजू माणगावकर, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.