Motivation Story : वडिलांचे छत्र हरपले, पण भाऊ-बहिणीने पोलीस होत आईच्या कष्टाचे केलं चीज

वडिलांचे छत्र नसताना मंदिराच्या बाहेर नारळ विकणाऱ्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवत शिक्षण घेणाऱ्या भाऊ-बहिणीने पोलीस होत आईच्या कष्टाचे चीज केलं.
Abhishek Khairmode and Aishwarya Khairmode
Abhishek Khairmode and Aishwarya Khairmodesakal
Updated on

इस्लामपूर - वडिलांचे छत्र नसताना मंदिराच्या बाहेर नारळ विकणाऱ्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवत शिक्षण घेणाऱ्या भाऊ-बहिणीने पोलीस होत आईच्या कष्टाचे चीज केलं आहे. इस्लामपूर येथील सुरेखा बापूराव खैरमोडे यांच्या ऐश्वर्या आणि अभिषेक बापूराव खैरमोडे या दोघा भावंडांनी मुंबई पोलीस दलाच्या भरती परीक्षेत यश मिळवले आहे. कष्टाच्या खडतर वाटचालीत जिद्दीने कुटुंबाची उभारणी करणाऱ्या सुरेखा खैरमोडे कालपासून अनेकांच्या कौतुकास पात्र ठरल्या आहेत.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी मुंबई येथे पोलीस दलाच्या भरतीसाठी प्रयत्न केले होते. पहिल्याच प्रयत्नांत दोघांनी पोलीस भरतीत यश मिळवले. बुधवार (ता. १७) रात्री त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होताच त्यांच्या घरी अभिनंदनासाठी रीघ लागली आहे. या दोघांची आताची यशाची कहाणी गोड असली तरी अख्या कुटूंबाचा प्रवास मात्र खडतर राहिला आहे.

Abhishek Khairmode and Aishwarya Khairmode
Solapur News : मंगळवेढासह जिल्ह्यात काँग्रेसला अच्छे दिन येणार - तालुकाध्यक्ष प्रशांत साळे

सुरेखा मूळच्या इस्लामपूरच्या. लग्नानंतर पाटणला गेल्या. मात्र हा संसार जेमतेम तीन वर्षे चालला. या तीन वर्षात त्यांना दोन मुले झाली. नवरा व्यसनाधीन असल्याने संसारात दोघांचे पटले नाही. सतत भांडण, मारहाण, छळ या त्रासाने त्या परत इस्लामपूरला आल्या. पतीने त्यानंतर परत नेण्याचा प्रयत्न केला, परंतु 'आधी दारू सोडा मगच मी नांदायला येते', म्हणणाऱ्या सुरेखा शेवटपर्यंत परत गेल्या नाहीत. पती व्यसनातून बाहेर पडलाच नाही, त्यामुळे हा संसार त्यांचा एकटीचा राहिला. याच वर्षी जानेवारीत पतीचे निधन झाले.

सुरेखा यांनी परिस्थितीला शरण न जाता संघर्ष करत दोन्ही मुलांना घडविले. काळा मारुती, शनीच्या मंदिराजावळ दर शनिवारी त्या नारळ विक्री करतात. तसेच राजेबागेस्वार मंदिरासमोरही त्यांचे दुकान असते. त्या स्वतः गाडा हाकतात. या नारळविक्रीतून त्यांनी मुलांची जडणघडण केली. ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघेही आदर्श शाळेचे विद्यार्थी आहेत. गुणवत्तेच्या सर्व पातळ्यांवर यश मिळवत त्यांनी शिष्यवृत्त्याही मिळवल्या आहेत.

Abhishek Khairmode and Aishwarya Khairmode
Education Loan : राज्य बँकेची घोषणा! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी पाच लाखांपर्यंत देणार बिनव्याजी कर्ज

येथील हर्ष अकॅडमीत संचालक रवी बावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्यावर्षी त्यांनी पोलीस भरतीचे उद्दिष्ट ठेवून प्रवेश घेतला. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. आईच्या कष्टाचे मूल्य जाणणाऱ्या आणि परिस्थितीचे भान जपणाऱ्या या दोन मुलांनी नशिबाला दोष देत किंवा गरिबीचे कारण देऊन मागेच राहणाऱ्या मुलांसाठी निश्चितच आदर्श निर्माण केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.