Freedom Fighter : स्वातंत्र्य सैनिक मानधनासाठी रंगराव बारवडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा

देश ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांची दखलही घेतली जात नाही.
Freedom Fighter Rangrao Barwade
Freedom Fighter Rangrao Barwadesakal
Updated on

इस्लामपूर - देश ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांची दखलही घेतली जात नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार व संवाद साधूनही क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील सहकारी रंगराव विठ्ठल बारवडे यांचे मानधन प्रकरण मंजूर करण्याकडे कानाडोळा केला जात आहे. त्यांचे वारस नितीन विश्वासराव बारवडे यांनी १५ ऑगस्टला दरे (जि. सातारा) येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा दिलेला इशारा देखील बेदखल करण्यात आला आहे.

१९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यलढयातील देशभक्त कै. रंगराव विठ्ठल बारवडे (शिगाव) यांच्या नावे ३० एप्रिल १९८४ ला शासनाकडे ‘भूमिगत स्वातंत्र्य सैनिक मानधन’ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. मानधन मंजूर न झाल्यास बारवडे यांनी स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांच्या गावी दरे येथील घरासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

आमदार, खासदार, मंत्री, शासकीय अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. खासदार धैर्यशील माने यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. परंतु काहीच झाले नाही. मला आत्मदहन करून घ्यावे लागेल.

- नितीन बारवडे, शिगाव

मुख्यमंत्री राहतात मुंबईला...

श्री. बारवडे यांनी मंत्रालय, मुख्यमंत्री निवासस्थान यासह दरे गावच्या पत्त्यावरही पत्रव्यवहार केला होता. अन्य ठिकाणांहून निवेदन पोहोचल्याचे त्यांना कळवण्यात आले. दरे येथून निवेदन परत आले असून त्यावर मुख्यमंत्री इथे राहत नाहीत, ते मुंबईला असतात, अशी नोंद घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.