Vidhansabha Election : 'निवडणुकीत भाकरी पूर्ण करपून जाण्याआधी परतली पाहिजे'; भाजप नेत्याचा सूचक इशारा

Islampur VidhanSabha Constituency : सत्तेची व्यवस्था बदलायला हवी. त्यानंतर तुम्हाला नक्कीच बदल घडलेला दिसून येईल.
Nishikant Patil
Nishikant Patilesakal
Updated on
Summary

‘‘सन २००९ पासून तुम्हाला जो ऊसतोडीचा, घराघरांत भांडणे लावण्याचा जो त्रास होतोय, त्याच एकच कारण आहे, ते म्हणजे अनेक वर्षे एकाच माणसाच्या हाती तुम्ही दिलेली सत्ता. त्यांचा एकाधिकारशाहीपणा सुरू आहे.''

आष्टा : ‘‘गेल्या ३५ वर्षांत इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील असमाधानकारक झालेला विकास व प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न यामुळे या मतदार संघातील जनतेच्या पदरी निराशाच आली आहे, ही परिस्थिती बदलायची असेल तर मतदारांनी या निवडणुकीत भाकरी पूर्ण करपून जाण्याआधी परतली पाहिजे आणि हीच ती संधी आहे,’’ असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (Nishikant Patil) यांनी मिरजवाडी व मौजे डिग्रज येथे विकास कामांच्या उद्‍घाटनप्रसंगी केले.

Nishikant Patil
विधानसभेला आमदार शहाजीबापूंच्या अडचणी वाढणार; 'या' नेत्यानं थोपटलं दंड, सांगोल्यात महायुतीत बिघाडी?

मिरजवाडी येथे १ कोटी ८ लाख व मौजे डिग्रज येथे ४५ लाखांच्या विकास कामांची उद्‌घाटन झाले. भोसले-पाटील म्हणाले, ‘‘सन २००९ पासून तुम्हाला जो ऊसतोडीचा, घराघरांत भांडणे लावण्याचा जो त्रास होतोय, त्याच एकच कारण आहे, ते म्हणजे अनेक वर्षे एकाच माणसाच्या हाती तुम्ही दिलेली सत्ता. त्यांचा एकाधिकारशाहीपणा सुरू आहे. ही ताकद कोठून आली, तर ती तुमच्या मतांमधून आली आहे. येथील सत्तेची व्यवस्था बदलायला हवी. त्यानंतर तुम्हाला नक्कीच बदल घडलेला दिसून येईल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला आशीर्वाद द्या.’’

भाजप इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, चंद्रकांत पाटील, निवास पाटील, सुरेखा जगताप, प्रवीण माने, संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, मधुकर हुबाले, यदुराज थोरात, जयश्री साळुंखे, भास्कर मोरे, सयाजीराव जाधव, दीपक पाटील, अनिल साळुंखे, जयसिंग नांगरे पाटील, दिगंबर ठाणेकर, अनिल सरदेशमुख, निशिकांत साळुंखे, कुमार पाटील, अजित लांडे, नाथगोंडा पाटील, माणिक आवटी, विजय शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.