सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा लॉगिन आयडी वापरुन सोलापुरातील वि. गु. शिवदारे फार्मसी कॉलेजमधील एका विद्यार्थ्याचे गुण वाढविल्याचा आरोप विद्यार्थी कॉंग्रेसने केला होता. मात्र, या प्रकाराची चौकशी केल्यानंतर एक नव्हे तर तब्बल 15 विद्यार्थ्यांना गुण वाढवून पास केल्याचे समोर आले आहे. आता या प्रकाराची चौकशी फॉरेन्सिक लॅब व सायबर क्राईमद्वारे होईल, असे कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी सांगितले.
हे आवश्य वाचाच...प्रेरणादायी...'या' विद्यापीठातील 43 मुलींनी कोरले सुवर्णपदकांवर नाव
परीक्षा विभागातील गैरप्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारुन कुलगुरुंनी राजीनामा द्यावी, अशी मागणी सुटा संघटना, प्राचार्य व मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेने केली. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही सिनेट सदस्यांनी गोंधळ घातला.
या पार्श्वभूमीवर कुलगुरुंनी राज्यपालांची भेट घेतली. त्यांच्या सूचनेनुसार सत्यशोधन समितीतर्फे चौकशी केली आणि त्यामध्ये कुलगुरुंचा हस्तक्षेप नसल्याचे उघड झाले. मात्र, एका विद्यार्थ्याला नव्हे तर 15 नापास विद्यार्थ्यांना गुण वाढवून पास केल्याचे समोर आले. याची व्याप्ती अधिक असल्याचा संशय व्यक्त करीत कुलगुरुंनी आता फॉरेन्सिक व सायबर क्राईमतर्फे सखोल चौकशीची मागणी राज्यपालांकडे केली आहे.
हे आवर्जुन वाचाच...खुषखबर...नियमित कर्जदारांना मिळणार दुप्पट लाभ !
उपकुलसचिव डॉ. चोपडे यांची हाकलपट्टी
सोलापूर विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. अर्चना साळुंखे-चोपडे यांनी स्वत:च्या मुलाच्या उत्तरपत्रिकांवर खाडाखोड करुन त्याला उत्तीर्ण केले होते. सत्यशोधन समितीच्या अहवालानंतर डॉ. चोपडे यांच्या सखोल चौकशीसाठी कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्त केली. या प्रकरणात नऊ साक्षीदार तपासले. सातपैकी सहा आरोप सिध्द झाले असून विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीत अशा व्यक्तींचा अडथळा असल्याचा युक्तीवाद विद्यापीठ नियुक्ती वकील मंजूनाथ कक्कळमेली यांनी केला. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन डॉ. चोपडे यांची हाकलपट्टी करण्यात आली आहे.
हेही आवश्य वाचाच... कठीण आहे...कोट्यवधींचा खर्च करुनही कुष्ठरोग निर्मूलन होईना
तीन कर्मचाऱ्यांची बदली
सोलापूर विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पद रिक्त असताना या विभागाचा पदभार कुलगुरु डॉ. फडणवीस यांच्याकडे होता. त्यावेळी कुलगुरुंच्या नावे एमकेसीएल, पुणे यांच्याकडून स्वतंत्र लॉगिन आयडी तयार करण्यात आला. मात्र, कुलगुरु परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांच्या पश्चात लॉगिन आयडीचा गैरवापर करुन फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना पास केल्याचेही समोर आले आहे. तत्पूर्वी, या प्रकारात कुलगुरुंचा हात असल्याचा आरोप प्राचार्य व प्राध्यापक संघटनांनी केला होता. त्यामुळे कुलगुरुंनी सत्यशोधन समिती नियुक्त केली आणि सखोल चौकशी केली. याची माहिती असूनही डोळेझाक केलेल्या तीन कर्मचाऱ्यांची बदली अन्यत्र करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.