Bailgada Sharyat : बैलगाडा मालकाचं होणार घराचं स्वप्न पूर्ण; पहिले बक्षीस 'वन बी एच के'फ्लॅट बैलगाडा शर्यतीचा थरार

कासेगावात जयंत केसरी चषक : अखंड भारतातून अनेक बैलगाडा चालक मालकाने आपल्या नावाची नोंद ऑनलाईन पद्धतीने केली
jayant kesari chashak bailgada sharyat winning prize of 1 bhk flat sangli
jayant kesari chashak bailgada sharyat winning prize of 1 bhk flat sangliSakal
Updated on

कासेगाव : येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमंदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक व कासेगाव ग्रा.पं. सदस्य अतुल लाहीगडे यांच्या संकल्पनेतून कै. शरद लाहीगडे (आण्णा) फाउंडेशन व कासेगाव बैलगाडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जयंत केसरी ओपन बैलगाडी शर्यत पर्व दुसरे शनिवारी (दि.१७) रोजी कासेगाव येथे होणार आहेत.

अखंड भारतातून अनेक बैलगाडा चालक मालकाने आपल्या नावाची नोंद ऑनलाईन पद्धतीने केली असल्याची माहिती अतुल लाहीगडे यांनी दिली.मागील वर्षी जयंत केसरी च्या स्पर्धा चांगल्या गाजल्या.जयंत केसरी ओपन बैलगाडी शर्यत पर्व दुसरे शनिवारी १७ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न होत आहे.

या शर्यतीत पाहिले बक्षिस १ बी एच के प्लॅट ठेवले असून चार चाकी गाड्या किंवा आर्थिक बक्षीस न देता प्रत्येक शेतकऱ्याचं किंवा बैलगाडी मालकाचे आपल्या स्वतःचे घर असण्याचे एक स्वप्न असतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आपण करत असल्याचे भावनिक मत आयोजक अतुल लाहीगडे यांनी सकाळ कडे व्यक्त केले.

दुसरे बक्षिस ६,०६,२६५, तिसरे बक्षिस ३,०६,२६५ चौथे बक्षिस २,०६,२६५ पाचवे बक्षिस १,०६, २६५ सहावे बक्षिस ६२,०६५ सातवे बक्षिस ६२,०६५ रोख रक्कम व कायम शिल्ड तसेच द्वितीय नंबरला येणाऱ्या बैलगाड्यांना रोख रक्कम बक्षिस देण्यात येणार आहेत.पाच हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने नोंद घेतली जाणार आहे.बैलगाडा शर्यत यशस्वीतेसाठी

विकास लाहिगडे, मकरंद माने, विक्रम गावडे, सोमनाथ लाहिगडे, अक्षय लाहिगडे, अभिषेक दंडवते, जितेंद्र पाटील, बजरंग माळी, शरद शिनगारे, अनिकेत कुंभार, कन्हैया बोडरे, पोपट माने, सागर पाटील, विजय काकडे, योगेश मोठे, महेश पाटील संभाजी पाटील, दिग्विजय सावंत, विनोद लाहिगडे, गनराज देशमुख, सुरज देशमुख, शार्दुल कुलकर्णी यांचेसह कार्यकर्ते संयोजन करीत आहेत.

नावाप्रमाणेच "अतुलनीय"नियोजन..

युवा नेते अतुल लाहीगडे यांनी मागील वर्षी नेटक्या नियोजनात बैलगाडी शर्यती घेतल्या होत्या. यावर्षी देखील चार पाचशेच्या वर बैलगाड्या शर्यतीसाठी येतील व परिसरातील अनेक बैलगाडा प्रेमींना हा थरार अनुभवायला मिळेल.

५० एकर शेतामध्ये ड्रोन कॅमेरे,मैदानावरती पुरेसा प्रकाशासाठी विजेचे खांब,तीस फुटाच्या एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार आहेत.१० बैलगाड्या धावतील अशा धावपट्ट्या आहेत. त्यामुळे भारतातील सर्वात मोठ्या होणाऱ्या स्पर्धेला गर्दी होणार आहे. बैलगाडी शर्यतीतील प्रत्येक क्षण ड्रोन कॅमेरा द्वारे टिपण्यात येणार आहेत. माजी मंत्री आमदार जयंत पाटील युवा नेते जयंत केसरी चषक आयोजक अतुल लाहीगडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()